राहुल गांधी, प्रियांका वड्रा राजकारणासाठी बनलेले नाहीत!

अभिनेत्री कंगना रनौटने केली बोचरी टीका

राहुल गांधी, प्रियांका वड्रा राजकारणासाठी बनलेले नाहीत!

हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढविणारी अभिनेत्री कंगना रनौत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.आजतक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे दोघेही राजकारणासाठी बनलेले नाहीत.हे दोघेही परिस्थितीला बळी पडलेले आहेत. राहुल गांधी यांनी कोणत्या तरी क्षेत्रात हात आजमावा.त्या पुढे म्हणाल्या की, राहुल गांधी हे जवळपास ६० वर्षांचे आहेत आणि त्यांना वारंवार तरुण म्हणूंन लाँच केले जाते.इतकेच नाहीतर कंगना रनौत यांनी राहुल गांधी यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केले.त्या म्हणाल्या की, ते ज्यांच्यासोबत प्रेम करतात त्याच्याशी लग्न होत नाही.त्यांना कोणत्याही दिशेने यश मिळत नाही.मला वाटते की ते खूप एकटे आहेत.

कंगना रनौत पुढे म्हणाल्या की, त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे की, हे करा ते करा.अशा लोकांना मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील पाहिले आहे.त्यांनी राजकारण सोडून दुसरे क्षेत्र निवडावे.त्यात त्यांना यश मिळू शकेल.त्यांना राजकारणात आणले जात आहे.मला राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे दोघेही आवडतात.पण दोघेही परिस्थितीचे बळी पडलेले आहेत.

हे ही वाचा:

नवनीत राणांचा लोकसभा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा; जात प्रमाणपत्र वैध

मोईत्रा यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा

सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही म्हणत काँग्रेस नेत्याचा पक्षाला रामराम

संजय निरुपम यांनी केलं स्पष्ट; आधी राजीनामा नंतर हकालपट्टी

कंगना रनौत पुढे म्हणाल्या, मी सोप्या भाषेत सांगत आहे की, दोघेही चांगली मुले आहेत.त्यांना राजकारणापासून दूर ठेवायला पाहिजे होते आणि सुखी जीवन द्यायला पाहिजे होते.या दोघांकडे बघून असे वाटेत की ते दोघेही आपल्या आयुष्याने त्रस्त आहेत.कंगना रनौत पुढे म्हणाल्या, आता वेळ आली आहे.मला आशा आहे की, त्यांची आई त्यांना चांगले मार्गदर्शन करेल.

दरम्यान, कंगना रनौत पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून प्रतिभा सिंह उमेदवार असण्याची चर्चा आहे.

Exit mobile version