काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
पक्षांतरबंदी कायद्याला भक्कम करण्याची संधी उद्धव ठाकरे यांना होती, पण त्यांनी ज्या घाईगडबडीत राजीनामा दिला ती त्यांची मोठी चूक होती. त्यांनी विधिमंडळाला सामोरे जायला हवे होते. तिथे आपले म्हणणे मांडायला हवे होते. काँग्रेस राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे सरकार आम्ही का स्थापन केले हे त्यांना तिथे मांडता आले अशते. महाराष्ट्राच्या जनतेलाही ते कळू शकले असते. भाजपाची भूमिकाही त्यात काय होती हे स्पष्ट होऊ शकले असते. पण ते झाले नाही, असे मत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयात झालेल्या सुनावणीसंदर्भात बोलताना त्यांनी उपरोक्त मत एबीपी माझा या वाहिनीवर बोलताना व्यक्त केले.
हे ही वाचा:
अडीच वर्षांनंतर प्रगती एक्स्प्रेस धावणार नव्या रुपात!
आता सगळ्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील, याचा आनंद!
पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्येची तिसरी घटना!
महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी
चव्हाण म्हणाले की, केवळ भाषण करून निघून जाणेही त्यांना शक्य होते, पण तेही न करता त्यांनी विश्वासमत चाचणी घ्यायला हवी होती. त्यांना कमी मते पडली असती, पराभव झाला असता तरी पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन त्यांच्या आमदारांकडून झाले हे जनतेसमोर आले असते. शिवसेनेच्या फुटीर गटाने त्यावेळचा उद्धव ठाकरे यांचा व्हिप झुगारला असता तर त्याचे उल्लंघन सर्वांसमोर स्पष्ट झाले असते आणि त्यांची आणखी अडचण झाली असती. उद्धव ठाकरे यांना याचा राजकीय फायदाही मिळाला असता शिवाय, फुटीर आमदारांना तिथे काही बोलता आले नसते.
चव्हाण म्हणाले की, कोर्टाने योग्य निर्णय घेतला आहे कारण हा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. तडकाफडकी निर्णय घेणे योग्य नाही. त्यामुळे मोठ्या पीठाकडे हा निर्णय द्यावा असे न्यायालयाने म्हटले आहे. पक्षांतरबंदी कायद्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्या कायद्याचं उल्लंघन झालेले आहे.