अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीला पृथ्वीराज चव्हाणांचा विरोध

राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीचा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने काल मंजूर केला.

अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीला पृथ्वीराज चव्हाणांचा विरोध

काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये राहुल गांधी यांनाचं अध्यक्ष बनवावं असा ठराव संमत झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (MPCC) आणि मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटी (MRCC) यांनी सोमवार, १९ सप्टेंबर रोजी स्वतंत्र बैठकीमध्ये राहुल गांधी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्याची विनंती करणारे ठराव पारित केले. याला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला आहे.

राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीचा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने काल मंजूर केला. हा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला होता. राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते असून आक्रमक आणि निर्भय आहेत. तसेच ते सामान्य माणसाचे नेतृत्व करतात, त्यामुळे त्यांना अध्यक्ष करावे यावर एकमत झालं. त्याला माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी त्याला अनुमोदन दिलं. बैठकीत उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी त्याला हात उंचावून समर्थन दिलं. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावेळी हातवर केला नाही.

हे ही वाचा:

बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप

अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन

‘उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मतांचा अपमान केला’

टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळाडू घालणार ‘हर फॅन की जर्सी’

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी आणि राहुल गांधी यांनी त्यात भाग घ्यावा, असं पृथ्वीराज चव्हाण यांचं मत आहे. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या G-23 गटातील आहेत. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, अशी G-23 गटाची मागणी आहे. त्यामुळे त्यांनी राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीला विरोध दर्शवला आहे.

Exit mobile version