काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची ‘छाप’!

पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची ‘छाप’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.स्वातंत्र्यासाठी लढणारी काँग्रेस दशकांपूर्वीच संपुष्टात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पूर्णपणे मुस्लिम लीगची छाप दिसत आहे.आता उरलेल्या काँग्रेसकडे ना देशहिताची धोरणे आहेत ना राष्ट्र उभारणीची दृष्टी.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी(६ एप्रिल) सहारनपूरमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.

निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘काँग्रेसने काल ज्या प्रकारचा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावरून हे सिद्ध झाले आहे की, आजची काँग्रेस आजच्या भारताच्या आशा आणि आकांक्षांपासून पूर्णपणे तुटलेली आहे. स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिम लीगमध्ये जी विचारसरणी प्रचलित होती तीच विचारसरणी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा ठसा पूर्णपणे उमटलेला आहे आणि त्याचा जो काही भाग शिल्लक आहे, त्यावर डाव्यांचे पूर्ण वर्चस्व आहे. यात काँग्रेस अजिबात दिसत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आता आम्ही भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या ध्येयात गुंतलो आहोत. तर दुसरीकडे आमचे विरोधक सत्ता मिळविण्यासाठी तळमळत आहेत. मी देशातील अशी पहिलीच निवडणूक पाहत आहे जिथे विरोधक विजयाचा दावा करत नसून, भाजपच्या जागा ३७० वरून आणि एनडीएच्या जागा ४०० वरून कमी व्हाव्यात यासाठीच विरोधक निवडणूक लढवत आहेत.

हे ही वाचा.. 

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातून जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा गायब

“आम्ही फक्त राम आणत नाही तर, समाजाच्या सुरक्षेला धोकादायक असणाऱ्याचा ‘राम नाम सत्य’सुद्धा करतो”

इक्ष्वाकू काळातील शिशाच्या नाण्यांचा साठा सापडला

अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

पंतप्रधान मोदींनी समाजवादी पक्षावर देखील निशाणा साधला.ते म्हणाले की, सपाची परिस्थिती अशी आहे की त्यांना प्रत्येक तासाला उमेदवार बदलावे लागत आहे.काँग्रेसची स्थिती तर आणखी विचित्र आहे, काँग्रेसला उमेदवारच मिळत नाहीत. काँग्रेस ज्या जागांवर आपला बालेकिल्ला मानत आहे, त्या जागांवर त्यांचे उमेदवार उभे करण्याचे धाडस देखील होत नाही. म्हणजेच ‘इंडी आघाडी’ हे अस्थिरता आणि अनिश्चिततेचे दुसरे नाव बनले आहे. त्यामुळे आज त्यांनी सांगितलेली एकही गोष्ट देश गांभीर्याने घेत नाही.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस जेवढी वर्षे सत्तेत होती, त्यांनी कमिशन खाण्याला प्रथम प्राधान्य दिले.ही इंडी आघाडीपण त्यासाठीच आहे. तर एनडीए मोदी सरकारच्या मिशनसाठी आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजप देशातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या कमी करत आहे. प्रत्येकासाठी नवीन संधी निर्माण करत आहे. सहारनपूरचे लाकूड, कोरीव काम आणि तेथील लोकांचे कौशल्य हे दूरवर प्रसिद्ध आहे. त्यामुळे योगीजी असो की मोदी, आम्हाला तुमची काळजी आहे. म्हणूनच आम्ही दोघेही एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो, ती म्हणजे वोकल फॉर लोकल. भारताला मजबूत देश बनवण्याची भाजपची वचनबद्धता असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

Exit mobile version