महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातही फोन टॅपिंग संबंधी गौप्य्स्फोट केला आणि महाराष्ट्रात एकाच खळबळ उडाली. यानंतर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर राज्य सरकारतर्फे अनेक गंभीर आरोप करण्यात आले. गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी फोन टॅपिंग प्रकरणा संबंधी आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. पण या अहवालावरून आता विरोधकांनी ठाकरे सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.
महाराष्ट्रात ठाकरे सरकारला फोन टॅपिंग पराक्रम चांगलेच जिव्हारी लागले असून राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे पडसाद उमटलेले दिसले. बुधवारी झालेल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीसांच्या या आरोपांना घेऊन चर्चा झाली. सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण अधिकाऱ्यांना ओळखायला कमी पडलो असा सुर आळवला. अधिकाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा? असा सवालही ठाकरेंनी विचारला. आपण सगळ्यांनी एकत्रपणे लढले पाहिजे आणि फडणवीसांचे मुद्दे खोडून काढले पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फोन टॅप होत असेल तर आपण काम कसं करणार? असा सवाल उपस्थित केला. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट राज्याच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख असेलल्या रश्मी शुक्ला यांच्यावरच आरोप केले. तर आता मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या अहवालाचा आधार घेऊन रश्मी शुक्ल यांच्यावर ठाकरे सरकार कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. पण भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ह्या अहवालाच्या आधारे ठाकरे सरकारलाच लक्ष्य केले आहे.
हे ही वाचा:
सचिन वाझे विरोधात खंडणीची तक्रार
निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत
मुंबईत, महाराष्ट्रात नोंदवली गेली आजवरची सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ
सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?
काय म्हणाले भातखळकर?
“सिताराम कुंटे यांच्या ‘फुटलेल्या’ ताज्या अहवालातून रश्मी शुक्ला यांनी परवानगी घेऊनच फोन टॅपिंग केले होते हे समोर आले आहे. त्यामुळे आता कोणाला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या अहवालावर कारवाई केली नाही?” असा सवाल आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
IPS रश्मी शुक्ला यांनी केलेले फोन टॅपिंग परवानगी घेऊनच करण्यात आले होते असे मुख्य आचिव सीताराम कुंटे यांच्या 'फुटलेल्या' ताज्या अहवालावरून स्पष्ट होते, आता प्रश्न हा उरतो की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अहवालावर कारवाई का केली नाही. कोणाला वाचवण्यासाठी? @OfficeofUT pic.twitter.com/xsX7rAdUGS
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 25, 2021
या अहवालावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असून या प्रकरणात सिबीआय चौकशी लावावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली आहे.