मुंबईतील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबईत येत आहेत. पंतप्रधानाच्या स्वागतासाठी मुंबईत जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकांमध्ये नरेंद्र मोदी यनाचे स्वागत केलेले आहे. पण हे स्वागत करतांना सामनाच्या अग्रलेखामध्ये विकासविरोधी राजकारणाचा कुजकट वास आहे. शिवसेनेच्या काळात झालेल्या कामांचं उद्घाटन मोदी करत आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखात केला आहे.
मुंबईतल्या अनेक प्रकल्पांची योजना, पायाभरणी, सुरुवात ही शिवसेनेची महापालिकेत सत्ता असताना झाली आहे. त्याचे उदघाटन मोदी करत आहेत, असा दावा करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत. माविआ सरकारच्या काळात पायाभरणी झालेली असली तरी शिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर येताच या सर्व प्रकल्पांना गती दिली. सत्तेवर आल्यानंतर अवघ्या सहा ते आठ महिन्यात मुंबईच्या विकासासाठी महत्वाचे निर्णय घेऊन त्याची तातडीने अमंलबजावणी केली. त्यामुळेच या प्रकल्पांचे उदघाटन होत आहे.
मुंबईकरांचा रोजचा दैनंदिन प्रवास सुखकर व्हावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुंबईत मेट्रो प्रकल्प राबवला. या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली होती. २०१९ मध्ये जनादेशाचा विश्वासघात करून सत्ता मिळवलेल्या उद्धवराव ठाकरेंनी सत्तेत आल्याआल्या पहिले काम कोणते केले असेल तर आरे कारशेड ला स्थगिती देण्याचे. मेट्रो प्रकल्प हा फडणवीस यांचा ड्रीम प्रकल्प असल्याने त्याला खो देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. आरे कारशेडसाठी कांजूरमार्ग चा बालहट्ट उद्धव ठाकरे यांनी केल्याने हा प्रकल्प रखडला.आरे कारशेडचे काम रखडल्यामुळे मुंबई मेट्रो प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटींनी वाढला परिणामी त्याचा बोजा राज्यातील जनतेवर पडला. मेट्रोचे काही शिवसेनेच्याच काळात झाले होते याचा विसर संजय राऊत यांना पडलेला दिसत आहे.
राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने या वाढलेल्या १० हजार कोटी रुपयांचा भर सहन करतानाच मेट्रो आरे कारशेडचे काम ८५ टक्के पूर्ण केले, भूयारी मेट्रोची चाचणी देखील झाली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहिसर आणि डीएन नगर , अंधेरी – दहिसरला जोडणाऱ्या मेट्रो मार्गाचे लोकार्पण होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना दिलेल्या सुखकर प्रवासाच्या वचनाची पूर्ती होत आहे. सत्तेत असतानाही मविआ सरकारला मुंबईचा विकास करण्यात अपयश आले. हे अपयश झाकण्यासाठीच संजय राऊत हे पोटशूळ उठल्यासारखे आरोप करत आहेत.
हे ही वाचा:
गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकारांचे कान टोचले!
कम्पाउण्डरला डॉक्टरवर भरवसा नाही का?
समीर मयेकर, निकाळजे यांच्या विज्ञान प्रकल्पाचे यश
दाव्होसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींचे करार
महाराष्ट्रातून सवा दोन लाख कोटींचे प्रकल्प पळवून नेले. हा मुंबईवरील आर्थिक आघात आहे. महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांच्या तोंडचा घास पळवून नेण्याचा प्रकार आहे. यालाच मुंबई-महाराष्ट्राचा भाग्योदय म्हणायचा का? अशीही टीका राऊत यांनी केली आहे. मविआ सरकारच्या काळात दावोसमध्ये किती कोटी रुपयांचे करार झाले याची टिमकी आदित्य ठाकरे वारंवार वाजवत आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांनी दावोस परिषेदला उपस्थित राहून महाराष्ट्रात ८८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर आणलीच पण त्याचा तपशीलही जाहीर केला. महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांच्या तोंडचा घास पळवून नेल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पण माविआ काळात किती रोजगार निर्मिती झाली हे कुठं आतापर्यंत जाहीर केले.
पंतप्रधान मुंबईत ज्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण वगैरे करणार आहेत, त्यातील बहुसंख्य प्रकल्प पालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाच पुढे सरकले. त्यामुळे शिवसेनेने केलेल्या नागरी कामाचेच उदघाटन करण्यासाठी पंतप्रधान मुंबईत येत आहेत अशी पोटदुःखी सामनाच्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे.