पंतप्रधानांची ‘सनातन धर्मा’च्या संरक्षणाची हाक

विरोधी गटात चिंतेचे सावट

पंतप्रधानांची ‘सनातन धर्मा’च्या संरक्षणाची हाक

उदयनिधी यांनी ‘सनातन धर्मा’वर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी याबाबत योग्य तो प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मंत्र्यांना केले आहे. त्यामुळे आता भाजपविरोधी ‘इंडिया’ गटासमोर कडवे आव्हान उभे राहणार आहे. जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केल्याचे सांगितले जात आहे.

‘भारत विरुद्ध इंडिया’ हा वादही सध्या उफाळून आला आहे. मात्र केंद्र सरकार भारत या नावासाठी अधिक उत्सुक आहे. त्यामुळे या विषयाशी संबंधित नेत्यांनी ‘भारत’ या नावाच्या बाजूने भूमिका मांडावी आणि विरोधकांना सडेतोड उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सनातन धर्माच्या रक्षणाचे केलेले आवाहन मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तेथे भाजपला काँग्रेसविरोधात लढण्यासाठी चांगला मुद्दा मिळाला आहे.

हे ही वाचा:

ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर बर्मिगहॅम दिवाळखोर म्हणून घोषित

विजयाचे गणितच न समजल्याने अफगाणिस्तानच्या हातून सामना गेला!

आम आदमी पक्षाने पंजाबात इंडी अलायन्सवर घातला घाव

अक्षयकुमारच्या चित्रपटाच्या नावात आता ‘भारत’

काँग्रेस या वक्तव्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया देत असल्याने भाजपला या विधानसभा निवडणुकांमध्ये आयते कोलित मिळाले आहे. ‘सनातन धर्म नामशेष करणे हे वक्तव्य गंभीरपणे घेण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करून मर्यादा ओलांडण्यात आली आहे. त्यामुळे या वक्तव्याविरोधात तीव्र लढा दिलाच पाहिजे, यावर मोदी ठाम आहेत,’ असे एका सूत्राने सांगितले.

Exit mobile version