नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधल्या सभेत बोलणार

नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधल्या सभेत बोलणार

पश्चिम बंगालमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहेत. यावेळी ते पुरूलिया येथील सभेला संबोधित करणार आहेत. या बद्दल त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.

मोदी यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगालच्या माझ्या बंधुंना आणि भगिनींना उद्या १८ मार्च रोजी संबोधित करायला मिळणार आहे याचा मला आनंद आहे. मी पुरूलिया इथल्या सभेत बोलणार आहे. संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये बदलाची इच्छा आहे. भाजपाचा उत्तम नियमनाचा अजेंडा जनतेच्या हृदयाशी जोडला गेला आहे.

भारतात पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका नियोजित आहेत. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याला २७ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. या निवडणुकीचा शेवटचा टप्पा २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. या निवडणुकांचे निकाल २ मे रोजी जाहिर होणार आहेत.

हे ही वाचा:

उरातला साधेपणा हे मनोहर पर्रिकरांचे वैशिष्ट्य होते

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा-नारायण राणे

पुण्यात कोविड-१९ मुळे चिंताजनक परिस्थिती, लवकरच लॉकडाऊन?

पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी भाजपा आणि तृणमुल काँग्रेसकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याचे राजकिय भांडवल करण्याचा प्रयत्न देखील तृणमुल काँग्रेसकडून केला गेला. त्याला भाजपाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिल्याने, एकंदरीतच ही निवडणुक अतिशय चुरशीची होणार आहे.

Exit mobile version