पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी उद्योजकांना संरक्षण क्षेत्रात उत्पादनासाठी निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी उद्योजकांना संरक्षण क्षेत्रात उत्पादनासाठी निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी कंपन्यांना संरक्षण उत्पादन क्षेत्रात उतरण्यासाठी आवाहन केले आहे. त्याबरोबरच मोदींनी खासगी क्षेत्राला संरक्षण सामग्रीचे प्रारुप तयार करण्याच्या कामातही पुढे येण्यास सांगितले आहे. त्याद्वारे देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावण्यास देखील त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

संजीवनी, शंकासुर आणि महाराष्ट्राचा ‘दशा’वतार

अर्थसंकल्पातील संरक्षणविषयक तरतुदींबद्दल बोलताना मोदी म्हणाले की संरक्षण विषयक तरतुदींमध्ये मोठा हिस्सा देशांतर्गत उत्पादनांच्या खरेदीसाठी राखून ठेवण्यात आला आहे.

“मी खासगी क्षेत्राला विनंती करतो की त्यांनी संरक्षण क्षेत्रातील उत्पादन, डिझायनींग आणि विकास यांसाठी त्यांचे योगदान देण्यासाठी पुढे यावे आणि देशाची शान वाढवावी.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असेही म्हटले की भारत सरकारने १०० संरक्षणासाठी आवश्यक अशा वस्तुंची यादी तयार केली असून त्यांचे उत्पादन देशांतर्गत उत्पादकाच्या मदतीनेच करणे शक्य आहे. त्यासाठी आपल्या उद्योजकांना वेळ मिळावा यासाठी सरकारने एक वेळापत्रक तयार केले आहे.

“अधिकृत भाषेत कदाचित ही नकारात्मक यादी असू शकते, मात्र आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने ही यादी सकारात्मक आहे. आपली उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने ही यादी सकारात्मक आहे. रोजगार निर्मितीसाठी देखील ही सकारात्मक यादी आहे.”

“या यादीमुळे संरक्षणाबाबतचे आपले परराष्ट्रांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. ही यादी सकारात्मक आहे कारण भारतात तयार झालेले सामान, भारतातच विकले जाणार आहे.” असे मोदींनी सांगितले.

Exit mobile version