२०१४ साली भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर ६९ वर्षीय शी जिनपिंग यांच्याशी वुहानमध्ये आणि त्यानंतर चेन्नईजवळील मम्मालापूर मध्ये दोन अनौपचारिक शिखर बैठक घेतल्या. त्यामुळे त्यांच्यातील संबंध सुधारण्या संबंधात अपेक्षा वाढल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिनी नेटिझन्सकडून आदराने ‘मोदी लाओक्सियान’ म्हणजेच मोदी अमर किंवा मोदी म्हणजे काहीतरी वेगळी क्षमता असलेली व्यक्ती असे म्हंटले आहे.
हा आंतरराष्ट्रीय नेत्याचा दुर्मिळ आणि आदरपूर्वक सन्मान आहे.असे दिसून येते. मोदीजी त्यांच्या पोशाख आणि शारीरिक स्वरूपावरून आपले लक्ष वेधून घेतात. लाओक्सियन सारखा दिसणारा म्हणजेच त्याची काही धोरणे जी भारताच्या पूर्वीच्या धोरणापेक्षा खूपच वेगळी आहेत. भारत आणि चीन सीमा वाद असूनसुद्धा यु एस आधारित स्ट्रॅटेजिक मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या लेखाप्रमाणे अफेअर्स मासिक द डिप्लोमॅट मधील लेखात, चीनच्या दृष्टिकोनातून भारत देश कसा आहे ह्यामध्ये सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले पत्रकार मु चुनशान यांनी यांनी म्हंटले आहे कि, भारत देश हा मोदींच्या नेतृत्वात अखंड प्रगती करेल.
जगातील इतर देशांसोबतच्या भारताच्या संबंधांबद्दल ते नेटिझन्स म्हणाले कि, रशिया, युनाइटेड स्टेट्स , किंवा ग्लोबल साऊथ देश असूदेत, भारताचा त्या सगळ्यांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहे जे खरोखर प्रशंसनीय आहे. मु यांनी पुढे लिहिले आहे कि, मी जवळपास २० वर्षे आंतरराष्ट्रीय मीडिया मध्ये लिहीत असून चिनी नेत्याने नेटिझन्स नि परदेशी नेत्याला एखादे टोपणनाव देणे हि दुर्मिळ गोष्ट आहे.
हे ही वाचा:
एक तास आधी या, तासभर आधी निघा…बिहार सरकारची मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी रमझानची सवलत
अखेर लाल वादळ शमलं, शेतकरी मोर्चा स्थगित
खलिस्तानचा खरा शत्रू भारत नसून पाकिस्तान!
मराठी चित्रपटात महत्त्वाचे योगदान देणारे प्रसिद्ध अभिनेते भालचंद्र कुलकर्णी कालवश
मोदींबद्दल कुतूहल, संमिश्र भावना, आश्चर्य व्यक्त करणे हे दुर्मिळ आहे. चिनी जनतेवर मोदींनी आपली छाप पाडली आहे हे नक्की. मोदीजी चीनमध्ये अशासाठी पण प्रसिद्ध आहेत कारण, २०१५ मध्ये त्यांनी सीना वेईबो या सोशल मीडिया खात्यामधून चिनी जनतेशी संवाद साधला होता. त्यामध्ये त्यांचे दोन पूर्णांक ४४ लाखांपेक्षा जास्त फोलोअर्स आहेत. दरम्यान भाजपचे सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या म्हणण्याप्रमाणे सीमेवर आर्थिक आघाडीवर आणि वैयक्तिक पातळीवर सुद्धा मजबूत संदेश देण्यासाठी भारत सरकारने एकूण ५९ चिनी अँपवर बंदी घातली आहे. तेव्हा २०२० पासून वेईबो सोडलेले आहे.