कॅनडाचे पंतप्रधन ट्रुडो देणार राजीनामा?

सोमवारी लिबरल पक्षाचे नेते म्हणून राजीनामा देण्याची शक्यता

कॅनडाचे पंतप्रधन ट्रुडो देणार राजीनामा?

कॅनडामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असून ‘द ग्लोब अँड मेल’ने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, कॅनडाचे पंतप्रधन जस्टिन ट्रुडो हे सोमवारी लिबरल पक्षाचे नेते म्हणून राजीनामा देण्याची शक्यता आहे. जस्टिन ट्रुडो यांना देशभरातून विरोध होत असताना त्यांच्याच पक्षातूनही अंतर्गत विरोध केला जात आहे. त्यामुळे ते हा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. नवीन नेत्याची निवड होईपर्यंत ट्रूडो ताबडतोब राजीनामा देतील की पंतप्रधानपदावर राहतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कॅनडामध्ये या वर्षी ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. आगामी फेडरल निवडणुकीत ट्रूडो हे विरोधी कंझर्व्हेटिव्ह्सकडून वाईटरित्या पराभूत होतील, असे मत सर्वेक्षणातून दिसून आले आहे. ट्रुडो यांच्या धोरणांवरून क्रिस्टिया फ्रीलँड यांनी देशाचे अर्थमंत्री आणि उपपंतप्रधानपद सोडल्यानंतर एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी झाला आहे. ट्रूडो यांचा राजीनामा देण्याचा निर्णय बुधवारी महत्त्वाच्या राष्ट्रीय कॉकस बैठकीपूर्वी अपेक्षित आहे.

२०१३ मध्ये, पक्ष गंभीर संकटात असताना ट्रूडो यांनी लिबरल पक्षाचे नेते म्हणून पदभार स्वीकारला होता. ट्रुडो यांनी अर्थमंत्री डॉमिनिक लेब्लँक यांच्याशी चर्चा केली आहे की ते अंतरिम नेते आणि पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारण्यास इच्छुक आहेत की नाही. फ्रीलँड, लेब्लँक, कॅनडाचे माजी गृहनिर्माण मंत्री शॉन फ्रेझर, परराष्ट्र व्यवहार मंत्री मेलानी जोली, इनोव्हेशन मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन, वाहतूक मंत्री अनिता आनंद, माजी केंद्रीय बँकर मार्क कार्नी आणि ब्रिटिश कोलंबियाचे माजी पंतप्रधान क्रिस्टी क्लार्क हे संभाव्य नेतृत्व दावेदारांमध्ये आहेत.

हे ही वाचा..

केजरीवाल यांचा ‘शीश महल’ लोकांना पाहण्यासाठी खुला करा!

बीड हत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण ताकदीने काम करतायत

टाटा पंचने मारुतीला मागे टाकले

देशाच्या राजधानीला विकासाची गरज, ‘आप-दा’ची नाही!

काही दिवसांपूर्वी कॅनडाच्या अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड यांनी अचानक राजीनामा दिल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रूडो यांच्या अडचणी वाढल्या होत्या. क्रिस्टिया फ्रीलँड यांनी राजीनामा देताना जस्टिन ट्रुडो यांना कमकुवत असल्याचे म्हटले होते. फ्रीलँड या ट्रुडोच्या जवळच्या मानल्या जात होत्या. त्यामुळे फ्रीलँड यांच्या राजीनाम्यानंतर जस्टिन ट्रुडो यांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते.

Exit mobile version