नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला बांगलादेशच्या पंतप्रधान आणि श्रीलंकेचे अध्यक्ष उपस्थित राहणार?

BIMSTEC देशांच्या नेत्यांना आमंत्रित केले जाण्याची शक्यता

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला बांगलादेशच्या पंतप्रधान आणि श्रीलंकेचे अध्यक्ष उपस्थित राहणार?

लोकसभा निवडणुकीनंतर आता एनडीएचे सरकार सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. ८ जून किंवा ९ जून रोजी नरेंद्र मोदींचा शपथ विधी सोहळा पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी या सोहळ्याला मान्यवर उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच विविध देशांमधील प्रमुखही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे हे उपस्थित असण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकत सरकार स्थापन करण्याचे चित्र स्पष्ट केले आहे. एनडीएचा नेता म्हणून नरेंद्र मोदींची निवड करण्यात आली आहे. एनडीए बैठकीतील प्रस्तावावर २१ नेत्यांनी सह्या केल्या आहेत. मोदींच्या शपथविधीसाठी भूतान, नेपाळ आणि मॉरिशसच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर, भारताने नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी BIMSTEC देशांच्या नेत्यांना आमंत्रित केले. BIMSTEC या प्रादेशिक गटामध्ये बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड यांचा समावेश आहे. २०१९ मध्ये व्हीव्हीआयपींसह तब्बल ८ हजार पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

हे ही वाचा:

एनडीएचा नेता म्हणून मोदींची निवड, बैठकीतील प्रस्तावावर २१ नेत्यांच्या सह्या!

‘जिंकलो आम्ही अन उड्या मारत आहेत दुसरे’

“फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या पण टीम म्हणून एकत्र काम करत राहणार”

केजारीवालांना दणका; न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ

याशिवाय २०१४ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींनी त्यांच्या पहिल्या टर्मसाठी शपथ घेतली तेव्हा सर्व सार्क (साउथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन) नेते या समारंभाला उपस्थित होते. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनाही आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी परदेशी नेत्यांना औपचारिक निमंत्रणे पाठवली जातील, अशी माहिती आहे.

Exit mobile version