वेदनेवर उपचार महत्त्वाचा हीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची कार्यशैली

मणिपूर घटनेतील आरोपींवर कारवाई होणार असल्याचा चित्रा वाघ यांचा विश्वास

वेदनेवर उपचार महत्त्वाचा हीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची कार्यशैली

मणिपूरमध्ये दोन समुदायांमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडीओ बुधवार, १९ जुलै रोजी व्हायरल झाला. देशभरातून या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेच्या व्हिडीओनंतर संताप व्यक्त केला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या व्हिडीओ प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

मणिपूरमधील घटना ही अतिशय दु:खद असून केवळ मणिपूर नाही तर १४० कोटी देशवासियांना प्रचंड वेदना देणारी आहे, अशा भावना चित्रा वाघ यांनी व्यक्त केल्या आहेत. मणिपूरमधील या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला असून त्यानंतर यातील चार आरोपींना अटक झाली आहे. महिला सुरक्षा हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिक गांभीर्याने घेतला असून सर्वच राज्यांना महिला सुरक्षेचे कायदे अधिक कठोर करण्यास सांगितले आहे, असे चित्रा वाघ म्हणल्या.

वेदना जाणवून थांबून जाणे किंवा नुसते विव्हळत राहणे, हा कुठल्याच समस्येवरील उपाय असू शकत नाही, तर वेदनेवर उपचार अधिक महत्वाचा असतो. नरेंद्र मोदीजी यांची हीच कार्यशैली नेहमी राहिली आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

हे ही वाचा:

श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम जवळपास पूर्ण

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला धावला ‘लालबागचा राजा’

मणिपूरमधील भयंकर व्हिडिओप्रकरणी चौघांना अटक

इर्शाळवाडीमध्ये बचावकार्याला सुरुवात; ५० ते ६० जण अजूनही ढिगाऱ्याखाली

दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडीओ बुधवार, १९ जुलै रोजी व्हायरल झाला. मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा व्हिडीओ आणि ही घटना ४ मे २०२३ रोजीची आहे. मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version