पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर होते. नरेंद्र मोदींचा दौरा चर्चेत होताच त्यासोबतच नरेंद्र मोदी यांचा जपान दौऱ्यादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जिन्यांवरून उतरत असतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
नरेंद्र मोदी हे काही बड्या नेत्यांसोबत जिन्यावरून चर्चा करत असतानाचा हा फोटो आहे. या फोटोत नरेंद्र मोदी हे जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत सर्वात पुढे चालत असून त्यांच्या मागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बानीज चालत आहेत. तसेच इतर काही नेते आणि महत्त्वाच्या व्यक्ती दिसून येत आहेत.
नरेंद्र मोदींचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असलेल्या या फोटोला वापरकर्त्यांनी #pictureoftheday असे कॅप्शन दिले आहे. तसेच ‘जागतिक नेता’ म्हणूनही नरेंद्र मोदींचे कौतुक केले जात आहे.
हे ही वाचा:
वराला टक्कल असल्याचे समजताच वधूने लग्न करण्यास दिला नकार
ओबीसी आरक्षण गेले हे महाविकास आघाडीचे पाप!
एटीएसची पुण्यात मोठी कारवाई, एका तरुणाला अटक
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार
भाजपाचे अमित मालवीय यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की, “जगाचे नेतृत्व… हजार शब्दांच्या मोलाचा हा एक फोटो आहे.” महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नरेंद्र मोदींचा फोटो शेअर करत म्हटले आहे की, ‘जागतिक नेता’
Leading the world… a picture is worth a thousand words. pic.twitter.com/T4lJ8rFt1u
— Amit Malviya (@amitmalviya) May 24, 2022
The Global LEADer ! pic.twitter.com/DbIfmqFsEJ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 24, 2022