जम्मू- काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून यात भाजपाला मिळत असलेल्या यशाबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू काश्मीरसह देशातील जनतेला हे कळून चुकले आहे की, देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पर्याय आहे. त्यामुळे त्या त्या राज्यातील जनतेला वाटतं की आपल्या राज्यातही मोदींचे सरकार यावे. त्यामुळे जनता विकसित भारतासह विकसित राज्यासाठी त्यांना साथ देत आहे. हेच या जनमतातून दिसून येत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत जर का आपण राहिलो, तरच राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकतो. म्हणूनच जम्मू काश्मीर आणि हरियाणातील नागरिकांनी भाजपला साथ देत मोठा विजय मिळवून दिला आहे. १४ कोटी जनतेच्या विकासाचे आणि राज्याला विकासाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर पोचवण्याचे स्वप्न असेल तर, राज्यात देखील डबल इंजिन सरकारच ते स्वप्न पूर्ण करू शकणार आहे. म्हणून प्रत्येक राज्यातील जनतेला असं वाटतं की, आपण नरेंद्र मोदींसोबत राहायला पाहिजे. महाराष्ट्रात देखील असेच काहीसे चित्र दिसेल,” असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना व्यक्त केला.
हे ही वाचा..
मुंबईतील वृद्धेची १.३० कोटीची फसवणूक
कांदिवलीतील आकुर्ली भुयारी मार्ग रुंदीकरणानंतर वाहतुकीसाठी खुला
तुतारी पक्ष मुस्लीम लीगचा पार्टनर आहे का?
डासना मंदिरावर हल्ला करणाऱ्या कट्टरपंथीयांवर कारवाई करा!
“लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी, एससी, एसटी ओबीसी, मागासवर्गीय इत्यादी समाज काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडला. काँग्रेसने प्रचारादरम्यान सांगितलं होतं की आमचा खासदार निवडून द्या, आम्ही महिलांना प्रतिमहिना आठ हजार रुपये खटाखट देऊ. मात्र, त्यानंतर काँग्रेस उघडी पडली आणि काँग्रेसचा खोटारडेपणा देशात उघड झाला,” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर केली आहे.