नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे, अजितदादांसोबत यावे!

पंतप्रधान मोदींची शरद पवारांना ऑफर

नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे, अजितदादांसोबत यावे!

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यासाठी राजकीय नेत्यांची प्रचार सभा जोरदार सुरु आहे.आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची नंदुरबारमध्ये सभा पार पडली.पंतप्रधान मोदींनी सभेला संबोधित करताना विरोधकांवर तोफ तर डागलीच शिवाय राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना एनडीएमध्ये सामील होण्याची थेट ऑफरचं दिली.तसेच उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींबाबत गाडण्याची भाषा केली त्यावरून देखील पंतप्रधान मोदींनी निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत आहेत. नकली शिवसेना, एनसीपीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याच मन बनवलय आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.ते पुढे म्हणाले, “शरद पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील”, अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना दिली आहे.

हे ही वाचा:

‘हिंदू दहशतवादा’चे पितृत्व पवारांचेच,ले.कर्नल पुरोहीतांचा गौप्यस्फोट…

“अनिल देशमुखांचे सत्य योग्य वेळी बाहेर काढणार”

‘अबब! १५ कोटी रुपयांचे ड्रग्स कॅप्सूल पोटात ठेवून तस्करी करणारा मुंबई विमानतळावर अटक’

११ वर्षांनंतर निकाल डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा; तिघे निर्दोष, दोन आरोपींना जन्मठेप

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, नकली शिवेसना मला गाडण्याची भाषा करत आहे. बाळासाहेब ठाकरेंना मी जवळून पाहिलं आहे. याबाबत बाळासाहेबांना आज किती दु:ख होत असेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.ते पुढे म्हणाले, नकली शिवसेनावाले बॉम्बस्फोटातील आरोपीला सोबत घेऊन फिरत आहेत.हे लोक जनतेचा विश्वास गमावून बसले आहेत.मातृशक्तीचा आशीर्वाद असल्याने मोदींना गाडू शकत नाही.नकली राष्ट्रवादी, शिवसेनेने काँग्रेसमध्ये जाण्याचे मन बनवले आहे.त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत यावं, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Exit mobile version