पंतप्रधान नरेंद्र मोदी संदेशखाली येथील पीडितांची घेणार भेट!

पश्चिम बंगाल युनिट प्रमुख सुकांत मजुमदार यांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी संदेशखाली येथील पीडितांची घेणार भेट!

पश्चिम बंगाल मधील संदेशखाली येथील महिला अत्याचार प्रकरण सातत्याने जोर धरत आहे.या प्रकरणावरून भाजपसह राज्यातील विरोधी पक्षांचा ममता सरकारवर हल्लाबोल सुरूच आहे.दरम्यान, ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालला भेट देणार असून तेथे ते संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट घेणार आहेत.

संदेशखाली येथील महिलांनी तृणमूल काँग्रेसचे जेष्ठ नेते शाहजहान शेख आणि त्याच्या समर्थकांवर जमीन हडप आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे.या प्रकरणी शाहजहान शेख अद्याप फरार असून त्याचा जवळीक साथीदार आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेता शिबाप्रसाद हाजरा उर्फ ​​शिबू हाजरा याला पोलिसांनी अटक केली आहे.शिबू हाजरा यांचावर लैंगिक छळाचा आरोप आहे.

दरम्यान, संदेशखाली येथील प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजप, काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घटनास्थळी भेट देण्याचा प्रयत्न केला.मात्र, बंगाल प्रशासनाने सुरवातीला संदेशखाली येथे जाण्यास परवानगी दिली नाही.त्यानंतर उच्च न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी आणि भाजपच्या काही आमदारांनी संदेशखाली येथे जाऊन स्थानिक लोकांची भेट घेतली.मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संदेशखाली येथे जाऊन पीडितांची भेट घेणार आहेत.भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटचे प्रमुख सुकांत मजुमदार यांनी ही माहिती दिली.

हे ही वाचा:

मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

कोलकत्ता उच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांना फटकारले

शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत शेतकऱ्याचा मृत्यू

“मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात”

सुकांत मजुमदार म्हणाले की, पंतप्रधान मोदी ६ मार्च रोजी पश्चिम बंगाल मधील उत्तर ३४ परगणा जिल्ह्यातील बारासात येथे महिलांच्या सभेला संबोधित करू शकतात.मजुमदार पुढे म्हणाले की, आम्हाला आज समजले की, पंतप्रधान मोदी ६ मार्च रोजी राज्याचा दौरा करणार आहेत आणि बारासात येथे महिलांच्या एका सभेला संबोधित करतील.

पंतप्रधान मोदी संदेशखाली येथील महिलांची भेट घेणार आहेत का? असा प्रश्न मजुमदार यांना विचारला असता ते म्हणाले की, जर संदेशखाली येथील भगिनी आणि माता यांना पंतप्रधान मोदींशी भेटायचे असेल तर आम्ही निश्चित स्वरूपात तशी व्यवस्था करू, असे सुकांत मजुमदार म्हणाले.

दरम्यान, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी स्पष्ट केले की, पोलीस संदेशखाली येथील प्रत्येक व्यक्तीची तक्रार ऐकून घेत आहेत.महिलांच्या अत्याचार प्रकरणात जो कोणी दोषी आढळले त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन डीजीपी राजीव कुमार यांनी सांगितले.

 

Exit mobile version