पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वाराणसीमध्ये १ हजार ७७४ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. वाराणसी मतदारसंघातील संपूर्णानंद स्टेडियममध्ये एका कार्यक्रमात त्यांनी या प्रकल्पांचे अनावरण केले. या प्रकल्पांमध्ये शिक्षणापासून ते रस्ते, रेल्वे आणि पर्यटन यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
वाराणसी में बह रही विकास की अविरल धारा में आज कई और परियोजनाओं की श्रृंखला जुड़ी है… pic.twitter.com/Jaq0vSp3j1
— Narendra Modi (@narendramodi) July 7, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर होते. त्यांनी वाराणसीच्या एलटी कॉलेजमध्ये अक्षय पत्र मिड डे मील किचनचे उद्घाटन केले. यानंतर, पंतप्रधान मोदींनी वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पोहोचले. जिथे त्यांनी शिक्षण मंत्रालयाच्या अखिल भारतीय शिक्षा समागमाचे उद्घाटन केले. अखिल भारतीय शिक्षण परिषदेला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले आहे.
अखिल भारतीय शिक्षा समागमाचा हा कार्यक्रम त्या पवित्र भूमीवर होत आहे, जिथे स्वातंत्र्यापूर्वी देशाचे इतके महत्त्वाचे विद्यापीठ स्थापन झाले होते. ही बैठक आज अशा वेळी होत आहे जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. अमृत काळात देशाचे अमृत संकल्प पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आपल्या शिक्षण व्यवस्थेवर आणि तरुण पिढीवर आहे. काशीला मोक्ष नगरी असेही म्हणतात कारण ज्ञान हाच आपल्यासाठी मोक्षाचा मार्ग आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला
पोलिसांनी तेलंगातील तीन पीएफआय कार्यकर्त्यांना केली अटक
उद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
पवईतील हिरानंदानी मॉलमध्ये भीषण आग
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, नवीन धोरणामध्ये मुलांच्या कलागुण आणि आवडीनिवडीनुसार त्यांना कुशल बनविण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आपण केवळ पदवीधारक तरुण तयार करू नये, तर आपले तरुण कुशल, आत्मविश्वासू, व्यावहारिक आणि गणनाक्षम असले पाहिजेत, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला आहे.