24.6 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरधर्म संस्कृतीपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले १०८ फुटी हनुमान पुतळ्याचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले १०८ फुटी हनुमान पुतळ्याचे उद्घाटन

Google News Follow

Related

आज, १६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील मोरबी येथे भगवान हनुमानाच्या १०८ फूट मूर्तीचे अनावरण केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. यावेळी पंतप्रधानांनी हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात ही मूर्ती बसवण्यात आली आहे. चारधाम प्रकल्पांतर्गत देशभरात चार दिशांना स्थापित केल्या जाणाऱ्या चार मूर्तींपैकी ही हनुमानची दुसरी मूर्ती आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पांतर्गत हनुमानाच्या मूर्ती चारही दिशांना बसवल्या जाणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हनुमानजी यांचे चारधाम प्रकल्पांतर्गत देशभरात चार दिशांना बसवण्यात येणाऱ्या चार मूर्तींपैकी ही दुसरी मूर्ती आहे. मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. देशाच्या पश्चिमेला स्थापित केलेला हा दुसरा पुतळा आहे. या प्रकल्पातील पहिला पुतळा २०१० मध्ये शिमल्यात बसवण्यात आला होता. त्यांनतर मोरबीमध्ये २०१८ मध्ये भव्य मूर्तीच्या उभारणीला सुरुवात झाली होती. १० कोटी रुपये या मूर्तीला खर्च आला आहे. पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याचवेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अन्य नेते कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

हे ही वाचा:

INFOSYS ची छप्परफाड कमाई

रशियासमोर आता आणखी दोन ‘युक्रेन’!

गोलमालमधील ‘रत्ना’ काळाच्या पडद्याआड

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन येणार भारत दौऱ्यावर!

देशात आज सगळीकडे हनुमान जयंती साजरी केली जात आहे. हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जन्मोत्सव वर्षातून दोनदा येतो. दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील मंदिरात महाआरती करणार आहेत. तर शिवसेना कार्यकर्त्यांनी दादरच्या हनुमान मंदिरात आरती केली. तसेच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने देखील महाआरती ठेवली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा