नेपाळ भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले माया देवी मंदिरात दर्शन

नेपाळ भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले माया देवी मंदिरात दर्शन

सोमवार, १६ मे रोजी म्हणजे आज बुद्ध जयंती असून, यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय नेपाळ दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत नेपाळचे पंतप्रधान होते.

देउबा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी बुद्ध पौर्णिमेनिमित्त लुंबिनीला एक दिवसीय भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. बुद्ध पौर्णिमेला माया देवी मंदिरात प्रार्थना केल्याबद्दल पंतप्रधान मोदी स्वतःला धन्य समजतात. तसेच भगवान बुद्ध आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो असे ट्विट पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसेच नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये, बुद्ध पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर, दोन्ही पंतप्रधानांनी म्हणजेच नेपाळच्या पंतप्रधान आणि भारताच्या पंतप्रधानांनी गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेल्या लुंबिनी येथील पवित्र मायादेवी मंदिरात पूजा आणि प्रार्थना केली आहे.

हे ही वाचा:

नितेश राणेंचा मुंबई पालिका आणि ठाकरे सरकारवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर

ज्ञानवापीमधली शिवलिंग सापडलेली जागा सील करण्याचे आदेश

केंटन कूल १६ वेळा एव्हरेस्ट सर करणारा पहिला परदेशी

लुंबिनी येथे देउबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वागत केले. त्यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देऊबांचे आभार मानले आहेत. दरम्यान, दक्षिण नेपाळच्या तराई मैदानी भागात स्थित लुंबिनी हे बौद्ध धर्माच्या पवित्र स्थानांपैकी एक आहे, तिथे भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी लुंबिनी डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे आयोजित बुद्ध जयंती सोहळ्याला संबोधित करणार आहेत. तसेच पंतप्रधान लुंबिनी मठ क्षेत्रामध्ये बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राच्या उभारणीच्या पायाभरणी समारंभातही सहभागी होतील.

Exit mobile version