लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले असून उर्वरित तीन टप्पे आता पार पडणार आहेत. या टप्प्यांसाठीचा प्रचार शिगेला पोहचला असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे बडे नेते प्रचाराकरिता मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही असाच सभांचा धडाका लावला असून ते रोज वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन सभा घेत आहेत. सभेमध्ये त्यांच्या सरकारने १० वर्षांत केलेली विकासकामांची यादी सांगतानाचं विरोधकांचा खरपूस समाचार देखील घेतला आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभेत आलेल्या लोकांकडेही व्यवस्थित लक्ष असते हे अनेकदा दिसून आले आहे.
सभेला आलेल्या जनतेकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष असते. सभेला आलेल्या लोकांकडे असलेली चित्र, फोटो यावर ते मनमोकळेपणाने प्रतिक्रिया देत असतात. त्यांच्या कलाकृतीचे कौतुक करत असतात. असाच एक प्रसंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तर प्रदेशातील जोनपूरमधील सभेत घडला.
या सभेत भाषण करत असताना तिथे उपस्थित असलेल्या दोन चिमुकल्यांची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. दोन लहान मुलांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि स्वत: पंतप्रधान मोदींचा पेहराव केला होता. हे दृश्य पाहून पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही लहान मुलांचे कौतुक केलं. तसेच, सभा माझी आहे पण हवा तुमचीच आहे, असं मोदी म्हणाले.
#WATCH | PM Narendra Modi appreciates two children dressed up as UP CM Yogi Adityanath and him at his public rally in Uttar Pradesh's Jaunpur. pic.twitter.com/jLcsiNkQ3k
— ANI (@ANI) May 16, 2024
हे ही वाचा:
‘भारत-फ्रान्सचे लष्कर दाखवणार क्षमता, मेघालयात ‘शक्ती’ सराव सुरू’
‘तर ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपींना अटक करू शकत नाही’
सीएए बद्दल खोटी माहिती पसरवून देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न
केजरीवाल यांच्या गळ्याभोवती नवा फास आवळू लागला!
पंतप्रधान नरेंद्र मोदी जोनपूरमधील सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांना दोन मुलं दिसली. या दोन लहान मुलांनी योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांच्यासारखे कपडे घातले होते. तसेच, हातवारे, हावभाव देखील त्यांच्यासारखे करत होते. हे पाहून मोदींनी आपलं भाषण थांबवलं आणि त्या दोन चिमुकल्यांची दखल घेतली. माझ्यावरून सारे कॅमेरे तुमच्याकडेच वळले आहेत, अशी मिश्कील टिपण्णी नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. यापूर्वीही एका सभेत नरेंद्र मोदी यांनी एका उभ्या असलेल्या वृद्ध स्त्रीसाठी खुर्चीची सोय करावी असं आपलं भाषण थांबवून सांगितले होते.