25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारण१०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट

१०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा आज, १८ जून रोजी वाढदिवस आहे. नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचा आज १०० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये पोहचले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आईची सदिच्छा भेट घेण्यासाठी गुजरातमध्ये त्यांच्या भावाच्या घरी पोहोचले आहेत. हिराबेन यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शिव आराधना आणि भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ११ मार्च रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना अहमदाबादमध्ये त्यांनी आईची भेट घेतली होती.

हे ही वाचा:

काँग्रेसच्या महिला आंदोलनात महिलाच गायब

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायदालनात आत्महत्येचा प्रयत्न

मलिक, देशमुखांच्या मतदानावर फुली

पाकिस्तानला चहा फुंकून प्यावा लागणार!

दरम्यान, नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच काही कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणार आहेत. बडोद्यात ते साधारण ४ लाख लोकांना संबोधित करणार आहेत. बडोद्यातील सहज रांगोळी ग्रुपच्या पाच कलाकारांनी सेंटर स्क्वेअर मॉलमध्ये मोदींची २५×१० फुटांची रांगोळी साकारली आहे. यात १५० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा