पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवार, २२ मे रोजी संध्याकाळी जपानला दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २३ मे आणि २४ मे हे दोन दिवस टोकियोला (जपान) भेट देणार आहेत. या दरम्यान नरेंद्र मोदी क्वाड संमेलनात देखील सहभाग घेणार आहेत.

नरेंद्र मोदी हे ४० तास जपानमध्ये असणार आहेत. या वेळात ते २३ बैठकांमध्ये उपस्थित असणार आहेत. २४ मे रोजी टोकियो येथे होणाऱ्या शिखर परिषदेत नरेंद्र मोदींशिवाय अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानेसे सहभागी होणार आहेत. शिखर परिषदेच्या बैठकीव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जो बायडन, फुमियो किशिदा आणि अँथनीबअल्बानेसे यांच्याशी स्वतंत्र द्विपक्षीय बैठक ही घेणार आहेत.

हे ही वाचा:

‘१.५, २ रुपये इंधन दर कमी करणे ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा’

फोटो काढला दुसऱ्याने; बळी मात्र लिलावतीचे सुरक्षा अधिकारी पराग जोशींचा

पश्चिम बंगालच्या तृणमूल उमेदवार निघाल्या बांगलादेशी नागरिक

हट्टाने उत्तर प्रदेशला गेलो असतो तर मनसैनिक सापळ्यात अडकले असते!

या दौऱ्यादरम्यान जपान आणि भारत यांच्या संबंधांवर चर्चा होणार असून पंतप्रधान मोदी हे तेथील उद्योजकांची देखील भेट घेणार आहेत. शिवाय क्वाड बैठकीत सहभागी चारही देशांचे संबंध अधिक सुदृढ होतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

Exit mobile version