पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या युरोप दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सोमवार,२ मे रोजी सकाळी बर्लिन येथे पोहोचले. पंतप्रधान मोदींचे बर्लिनमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. बर्लिनमधील हॉटेल एडलॉन केम्पिंस्की येथे सकाळपासूनच भारतीय वंशाचे लोक पंतप्रधानांच्या आगमनाची वाट पाहत होते. पंतप्रधान पोहोचताच लोकांनी वंदे मातरम आणि भारत माता की जयचा नारा सुरू केला. मात्र, पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी आलेल्या
त्यांच्या पालकांसोबत आलेल्या मुलांनी मने जिंकली.
#WATCH Indian diaspora extends a warm welcome to PM Modi in Berlin, Germany
(Source:DD) pic.twitter.com/H0yX5LWut4
— ANI (@ANI) May 2, 2022
पंतप्रधान मोदींचे अनेक भारतीय बर्लिनमध्ये स्वागत करत होते. त्यावेळी त्यांच्या पालकांसोबत लहान मुलांनीही उपस्थिती लावली होती. पंतप्रधान मोदींचे एका लहान मुलीने चित्र रेखाटले होते तिचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. तिच्यासोबत फोटो काढत तिला चित्र रेखाटायला किती वेळ लागला विचारले आणि तिचे भरभरून कौतुक केले. त्या लहान मुलीने पंतप्रधान मोदींना आयकॉन म्हटले . तसेच एका मुलाने, पंतप्रधान मोदींना एक देशभक्तीपर गीत म्हणून दाखवले, त्यालाही पंतप्रधान मोदींनी टिचकी वाजवत दाद दिली. त्या लहान मुलांचेही भरभरून पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. पंतप्रधानांच्या आगमनावेळी देशभक्तीपर गाणे गायल्यामुळे भारतीय वंशाच्या त्या मुलाचे सर्वांनी प्रचंड कौतुक केले.
हे ही वाचा:
‘शिवसेना नेत्यांना बुद्धिदोष झाला आहे’ आशीष शेलारांची टीका
‘उद्धव ठाकरे भगवे उतरवून हिरवे झालेत’
योगी सरकारने धार्मिक स्थळांवरून बेकायदा ५३ हजार ९४२ भोंगे उतरवले
स्पाईसजेट विमानाला लँडिंगवेळी अपघात; ४० जण जखमी
दरम्यान, आज पंतप्रधान भारत जर्मनीचे संबंध मजबूत करण्यासाठी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. यांनतर ३ मे रोजी पंतप्रधान मोदी इंडो-नॉर्डीक परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यांनतर डेन्मार्कमध्ये भारतीयांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा यावर्षात हा पहिलाच विदेशी दौरा आहे.