पंतप्रधान दौऱ्याआधी उपमुख्यमंत्र्यांनी सीएसएमटी स्थानकाची केली पाहणी

स्थानकाला छावणीचे स्वरूप प्राप्त.

पंतप्रधान दौऱ्याआधी उपमुख्यमंत्र्यांनी  सीएसएमटी स्थानकाची केली पाहणी

पंतप्रधान मोदी यांची आज दुपारी मुंबईत दाऊदी बोहरा समाजच्या शैक्षणिक संस्थेच्या नवीन कॅम्पसचे मरोळ येथे उदघाटन आणि त्या आधी दोन वंदे भारत एक्सप्रेसला सीएसएमटी स्थानकात हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी सोमवारी काल मुंबईत मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्थेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर पाहणी केली.   पंतप्रधानांची हि अलीकडील दुसरी मुंबई भेट आहे.

पंतप्रधानांच्या भेटीमुळे कुलाबा,रिगल जंकशन,आणि पी डिमेलो रोडच्या आसपासची वाहतूक दुपारी दोन ते सव्वा चार वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक आणि डोमेस्टिक विमानतळ ते मरोळपर्यंतची वाहतूक होणार असून चार ते सहा वाजेपर्यंत थोडासा बदल होईल.  सार्वजनिक शांतता भंग , मानवी जीवन,आरोग्य ,सुरक्षितता आणि सार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याचा गंभीर धोका असल्यामुळे पोलिसांनी विशेष काळजी घेणार असल्याचे सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई पोलिसांबरोबर सीएसएमटी स्थानकात पूर्ण भागाची पाहणी केली. आजच्या पंतप्रधानांच्या मुंबई भेटीच्या कार्यक्रमात मुंबई विमानतळ,आयएनएस शिक्रा,सीएसएमटी ,मरोळ येथे मोठ्या संख्येने व्हीआयपीएस,विविध अधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. ड्रोन,पॅराग्लायडर,रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट ऐअर क्राफ्ट,अशा विविध माध्यमातून असामाजिक घटक हल्ला करू नये याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करणार आहेत. दुपारी दोन वाजून ५५ मिनिटांनी ते पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुंबई विमातळावर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत ते पंतप्रधानांबरोबर वंदे भारत आणि मरोळ येथील कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेसच्या उदघाटनामुळे सेवाग्राम एक्सप्रेस मुंबई नागपूरचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. हि एकमेव ट्रेन ज्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. नागपूर ते मुंबई दोन तास उशिराने धावणार असल्याने सीएसएमटी नागपूर रेल्वेच्या अनुषंगाने पूर्वनियोजित राहील.

 

Exit mobile version