आज पंतप्रधान मोदींनी केली युक्रेनच्या अध्यक्षांशी चर्चा

आज पंतप्रधान मोदींनी केली युक्रेनच्या अध्यक्षांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. हा फोन कॉल जवळपास ३५ मिनिटे चालला होता. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा केली आहे. भारत सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधानांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या थेट चर्चेचे कौतुक केले आहे.

या मीटिंग मध्ये पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने दिलेल्या मदतीबद्दल राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आभार मानले आहेत. सुमीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये युक्रेन सरकारची मदत पंतप्रधानांनी मागितली आहे.

कीवमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पोल्टावामार्गे पश्चिम सीमेवर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी त्यांची टीम पोल्टावा शहरात तैनात आहे. आणि त्यासाठी निश्चित वेळ आणि तारीख जारी केली जाणार आहे. दूतावासाने विद्यार्थ्यांना अल्प सूचनेवर सोडण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विनंतीनंतर, रशियाने सोमवारी युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी लोकांसाठी मानवतावादी मार्ग उघडण्यासाठी थोड्या वेळासाठी युद्धविराम जाहीर केला.

हे ही वाचा:

… म्हणून भारतीय महिलांचं होतंय कौतुक!

‘कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला काय लकवा मारलाय काय?’

युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर; सेन्सेक्स १३०० अंकांनी कोसळला

‘नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार आहात?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशीही चर्चा करणार आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर मोदी आणि पुतिन यांच्यातील ही तिसरी भेट असेल तर झेलेन्स्की यांच्याशी पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा चर्चा केली आहे. यापूर्वी झेलेन्स्की आणि मोदी यांच्यात २६ जानेवारीला फोनवर चर्चा झाली होती. त्यावेळी भारताने रशिया आणि युक्रेनच्या सर्वोच्च नेत्यांना युद्ध ताबडतोब संपवून संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून मतभेद दूर करण्याचे आवाहन केले होते.

Exit mobile version