पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज(१९ एप्रिल) वर्ध्यात सभा पार पडली. महायुतीचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मोदींची आज सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी पंतप्रधानांनी आपल्या कामाची पोच पावती दिली आणि भविष्यात पूर्ण करणाऱ्या योजनाही सांगितल्या.तसेच विरोधकांवर जोरदार टीका केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आजच्या भाषणाची सुरुवात मराठी भाषेने केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती’ या सभेला उपस्थित बंधू-भगिनींना माझा जय गुरु.ही अनेक साधू-संतांची पावन भूमी आहे.या सर्वांचे स्मरण करण्यासाठी मला हा योग मिळाला यासाठी स्वतःला मी भाग्यशाली समजतो. आज चैत्र एकादशी देखील आहे. पंढरपूरची आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघी अशा चार यात्रा महत्त्वाच्या असतात. यापैकी आज चैत्र एकादशीची यात्रा आहे. आज प्रत्येक दिशेला गुंजत आहे, रुप पाहतां लोचनीं, सुख जालें वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.अशा पुण्यपर्वकाळात भगवान श्री विठ्ठलांच्या चरणी मी शतश: नमन करतो”.२०२४ ची लोकसभा निवडणूक विकसित भारत आणि आत्मनिर्भरतेसाठी आहे.
ते पुढे म्हणाले की, २०१४ च्या पूर्वी एक धारणा बनली होती की देशात काहीहि चांगले होऊ शकत नाही.चारही बाजूला फक्त निराशा होती, गावात पाणी, लाईट, रस्ते या निर्माण होऊ शकत नाही, असे गावातील लोकांना वाटत होते.गरिबीतून मुक्ती मिळणार नाही असे गरीब नागरिकाला वाटत होते, शेतकऱ्यांचेही हेच होते.महिल्यांच्याही समस्या त्याच होत्या.ज्यांना कोणालाच विचारले नाही त्यांना या गरीबाच्या मुलाने पुजले आहे.यावेळी पंतप्रधान मोदींनी मागील १० वर्षातील कामकाजाची माहिती सांगितली.
हे ही वाचा:
मणिपूर मतदान केंद्रावर गोळीबार, कव्हरसाठी मतदारांची धावपळ!
पहिल्यांदा मतदान केलेत, आता एअर इंडिया एक्स्प्रेसमधून करा स्वस्तात प्रवास!
सुनेला हिणवणाऱ्या शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणे म्हणजे ढोंगीपणाचा कळस!
‘संपूर्ण जगाने पाहिली आहे मोहम्मद शमीची कमाल’
काही थोडेफार लोक असतील ज्यांना आमच्या योजनांचा लाभ मिळाला नसेल, त्यांच्या समस्या आमच्याकडून पूर्ण झाल्या नसतील.तुम्ही माझेच प्रतिनिधी आहात, माझ्यासाठी तुम्हीच मोदी आहात.तुम्ही एक काम करा ज्या लोकांना घर, गॅस, पाणी, शौचालय यांचा लाभ मिळाला नाही अशा लोकांची नोंद करून मला पाठवा आणि त्यांना सांगा मी मोदींकडून आलो आहे, मोदींची गॅरंटी घेऊन आलोय, जेव्हा मोदी तिसऱ्यांदा निवडून येतील तेव्हा तुमच्या सर्व समस्या पूर्ण होतील.आत्मविश्वासाने भरलेला देश आज मोदींची गॅरंटी बघत आहे.’गॅरंटी अशीच दिली जात नाही त्यासाठी खूप मोठी हिंम्मत लागते’. त्यासाठी संपूर्ण रोड मॅपिंग असत, काम पूर्ण करण्याचा मनामध्ये संकल्प असतो.कितीही अडथळे येवो, मी करूनच दाखवणार.तेव्हा गँरंटी बाहेर पडते.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पक्षाच्या ‘संकल्प पत्रातील’ आश्वासनांचा उल्लेखही केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इंडी आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली.ते म्हणाले की, काँग्रेस आणि इंडी आघाडीतील नेत्यांचे विचार हे कायम विकास आणि शेतकरी यांच्या विरोधातील आहेत.त्यामुळे दशकांपर्यंत शेतकऱ्यांचा हाल खराब होते.त्यांच्या काळात जशी कामे होतं त्याला एक मराठी मध्ये म्हण आहे, ‘बारशाला गेला आणि बाराव्याला आला’.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे संपूर्ण ताकदीने तुमच्या सेवेसाठी उतरले आहेत.इंडी आघाडी यांच्याकडे आता काहीच मुद्दे नसल्याने केवळ शिव्या आणि टीका करत आहेत.सनातन धर्माचा विनाश करू असे वक्तव्य करणाऱ्या लोकांसोबत हे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभुमीत रॅली काढतात.काँग्रेस आणि त्यांचे मित्र राम मंदिराचाही बहिष्कार करतात.रामनवमी निम्मित प्रभू रामाचा ‘सूर्य टिळक’ अभिषेक होता तेव्हा देखील इंडी आघाडीतील एका नेत्याने म्हटले की, हे सर्व पाखंड आहे.काँग्रेस पार्टीचा आणि त्यांच्या मित्रांचा हा खरा चेहरा आहे.काँग्रेसच्या पापांचा हिशोब तुम्हाला करायचा आहे.त्यामुळे काँग्रेस आणि इंडी आघाडीतील नेत्यांना मत देणं म्हणजे एक मत व्यर्थ गेलं म्हणून समजा.वर्ध्यातून भाजप उमेदवार रामदास तडस आणि अमरावती मधून नवनीत राणा यांना प्रचंड मताने विजयी करा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.