पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली नवीनच्या कुटुंबाचे सांत्वन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली नवीनच्या कुटुंबाचे सांत्वन

आज रशिया युक्रेनच्या युद्धात नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. अवघ्या २१ व्या वर्षी मुलगा गेल्याने नवीनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा हळहळ व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी नवीनच्या कुटुंबाशी संवाद साधला आहे.

नवीन गेल्याची बातमी कळताच देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी बोलून त्यांच्याकडून नवीनच्या वडिलांचा नंबर घेतला आणि नंतर नवीनच्या वडिलांशी पंतप्रधानांनी संपर्क साधून त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्ववभूमीवर आज थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

रशियाने युक्रेवर केलेल्या भीषण हल्ल्यात सोळा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, या वृत्ताला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कि यांनी दुजोरा दिला आहे. तर युक्रेनच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरावर रशियन गोळीबारात आज किमान दहा लोक ठार झाले आणि अनेक जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

‘काचा बदाम’ फेम भुबन बड्याकर यांचा अपघात

ताज महालच्या ‘नो फ्लायिंग झोन’ मधून विमान गेल्याने खळबळ

युक्रेनमध्ये व्होडाफोनसह अनेक टेलिकॉम कंपन्या देणार फ्री कॉलींग

रशियाने युक्रेनमधील मारियुपोल शहरावर ताबा मिळवला आहे. रशियन सैन्याने हल्ल्यानंतर युक्रेनच्या प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या मारियुपोलमधील वीज बंद केली आहे. रशियाने ताबडतोब आपले सैन्य मागे घ्यावे आणि युक्रेनमधील “रक्तपात” संपवावा, असे जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांनी मंगळवारी सांगितले आहे. आणि मॉस्कोच्या आक्रमकतेला शिक्षा देण्यासाठी पुढील निर्बंधांचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Exit mobile version