पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत एका वर्षात २६ लाख रुपयांची वाढ झाली आहे. पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींकडे एकूण २.२३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीतील बहुतांश रक्कम बँकांमध्ये ठेवीच्या स्वरूपात आहे. पंतप्रधान मोदींकडे कोणीतही स्थावर मालमत्ता नाही. त्यांच्या वाट्याची जी गांधीनगरमधील जमीन होती ती त्यांनी दान केली आहे.
पीएममोने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींची बाँड, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक नाही, परंतु त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांची किंमत १.७३ लाख रुपये आहेत. पंतप्रधान मोदींच्या मालमत्तेत एका वर्षापूर्वीच्या तुलनेत २६.१३ लाख रुपयांची वाढ झाली आहे. परंतु त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. ३१ मार्च २०२२ पर्यंत, पंतप्रधान मोदींकडे एकूण २ कोटी २३ लाख ८२ हजार ५०४ रुपये मालमत्ता आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी निवासी जमीन खरेदी केली होती. पंतप्रधान मोदींकडे ३१ मार्च २०२२ पर्यंत एकूण ३५ हजार २५० रुपये रोख रक्कम आहे. त्यांच्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये ९ लाख ५ हजार १०५ रुपये किमतीची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आहेत. तसेच १ लाख ८९ हजार ३०५ रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे.
हे ही वाचा:
खेळाडूंची पुढची पिढी तयार होतेय, ‘तो’ व्हिडीओ बघून आनंद महिंद्रांची प्रतिक्रिया
संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे चित्रा वाघ संतापल्या
डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा
शिंदे फडणवीस सरकारमध्ये १८ कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील इतर सहकार्यांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचाही समावेश आहे ज्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे. सिंह यांच्याकडे ३१ मार्च २०२२ पर्यंत २.५४ कोटी रुपये आणि २.९७ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंधिया, आरके सिंग, हरदीप सिंग पुरी, पुरुषोत्तम रुपाला आणि जी रेड्डी यांनी मोदी मंत्रिमंडळातील सर्व २९ सदस्यांमधील स्वतःची आणि त्यांच्या अवलंबितांची संपत्ती जाहीर केली आहे.