लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दोन दिवसांपूर्वी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.या यादीत डॉ.अब्दुल सलाम यांचे देखील नाव आहे.विशेष म्हणजे भाजपच्या यादीत हे एकमेव मुस्लिम उमेदवार आहे.केरळच्या मलप्पुरम मतदारसंघातून डॉ.अब्दुल सलाम यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.डॉ.अब्दुल सलाम म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या कार्याने मी प्रभावित झालो आहे.पंतप्रधान मोदींनी मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी खूप काम केले आहे.
न्युज १८ च्या बातमीनुसार डॉ.अब्दुल सलाम म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या मशालीने मुस्लिमांमध्ये पसरलेला अंधार दूर करेन.मी त्यांना सांगेन की, तुम्ही अंधारात जगत आहात, मात्र तसे वास्तविक नाहीये.मात्र, तुमच्या चारही बाजूला तसे तयार करण्यात आले आहे.ते पुढे म्हणाले की, मुस्लिमांना पुढे जाण्याच्या सर्व दिशा ह्या मदरशांमधूनच मिळत असतात.ते एका वेगळ्या युगात जगत आहेत.मजबूत मशाल घेऊन या लोकांमध्ये जाण्याचा माझा उद्देश आहे.पंतप्रधान मोदींकडून करण्यात आलेल्या विकासाच्या प्रकाशाचा उजेड त्यांच्या हृदयात आणि डोक्यात भरायचं आहे, असे डॉ.अब्दुल सलाम म्हणाले.
हे ही वाचा:
स्वतःच्या जुळ्या मुलांना पाहण्याआधी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी धाव
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकणार
विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत आलोक, दुर्वाला सुवर्ण
भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली
दरम्यान, केरळ हे देशातील अशा काही राज्यांपैकी एक आहे जिथे भाजपला अद्याप कोणतेही मोठे यश मिळवता आलेले नाही. केरळमधील लोकसभेच्या २० जागांपैकी सध्या एकही जागा नाही. मलप्पुरम ही मुस्लिमबहुल लोकसभा जागा आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने केरळमधील हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे.हा मतदारसंघ इंडियन युनियन मुस्लिम लीगचा बालेकिल्ला मानला जातो.
विशेष म्हणजे १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर एकही हिंदू व्यक्ती या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आला नाही. गेल्या ७० वर्षांपासून येथून केवळ मुस्लिम उमेदवारच विजयी होत आहेत.दरम्यान, यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजपकडून हिंदू नेत्यांना उभे केले जायचे.आता मात्र, भाजपने येथून एका मुस्लिमाला उमेदवारी दिली आहे.डॉ.सलाम यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ.सलाम हे खूप शिकलेले व्यक्ती आहेत.२०११ ते २०१५ पर्यंत ते कालिकत विद्यापीठाचे कुलगुरू होते.