निवडणूक विजयानंतर पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो

निवडणूक विजयानंतर पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो

उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून रोड शोला सुरुवात केली आहे. फुलांनी सजवलेल्या खुल्या जीपमधून मोदींनी रोड शो दरम्यान रस्त्याच्या कडेला जमलेल्या शेकडो समर्थक आणि चाहत्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान मोदींनी विमानतळ ते अहमदाबादमधील भाजप कार्यालयापर्यंत रोड शो केला. या रोड शोच्या मार्गावर जवळपास पन्नास स्टेज तयार करण्यात आले होते. विमानतळावरून केलेल्या या रोड शो वेळी सुमारे चार लाख लोक उपस्थित होते. कालच्या निकालाचा आनंद जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले आहेत.येथे पंतप्रधान मोदी गुजरात पंचायत महासंमेलनाला संबोधित करणार आहेत. तसेच १२ मार्च रोजी पंतप्रधान मोदी राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ (RRU) इमारत देशाला सुपूर्द करणार आहेत. तर पंतप्रधान मोदी आरआरयूच्या पहिल्या दीक्षांत समारंभालाही संबोधित करणार आहेत. यावेळी गुजरात पंचायत महासंमेलनामध्ये राज्यातील पंचायती राज संस्थांच्या तिन्ही स्तरांतील एक लाखांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित असणार आहेत यानंतर पंतप्रधान मोदी येथे खेळ महाकुंभाचे उद्घाटनही करणार आहेत.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या ‘या’ कृतीमुळे उत्तर कोरियाला आला राग

निष्पक्ष संस्थांना बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांची इको सिस्टीम

पंतप्रधान मोदींच्या सुशासनाला दिलेला जनतेचा हा आशीर्वाद!

मोबाईल रिपेअर करणाऱ्याने मुख्यमंत्री चन्नी यांना केले पराभूत

गुजरातमध्ये आज पंतप्रधान मोदी भाजप कार्यालयात खासदार, आमदार आणि राज्य संघटनेच्या अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोदी आपल्या गृहराज्याला भेट देत आहेत. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Exit mobile version