लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. ४००चा आकडा पार करण्यासाठी पक्षाचे नेते अन तळागाळातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील देशभरात रोड शो, रॅली, सभा पार पडत आहेत. निवडणुकीच्या प्रचाराकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज शनिवार (६ एप्रिल) उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये भव्य रोड शोला सुरुवात झाली आहे.
या भव्य रोड शोमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गाझियाबादचे भाजपचे उमेदवार अतुल गर्ग, आणि केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार व्हीके सिंग यांचा देखील सहभाग आहे. तब्बल १.५ किलोमीटर लांबीच्या रोड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पक्षाचे कार्यकर्त्यांचा देखील सहभाग आहे.
रोड शो दरम्यान पंतप्रधान मोदींची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांकडून मोदी-मोदी, हर-हर मोदी, घर-घर मोदी अशा घोषणा देण्यात आल्या.रोड शो दरम्यान जय श्री राम, वंदे मातरमच्याही घोषणा देण्यात आल्या. १.५ किलोमीटर रोड शोमध्ये ३६ ठिकाणी मोदी-योगी यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
हे ही वाचा..
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची ‘छाप’!
१९८४ साली दोन सीट ते २०२४ला ४०० जागा पार करण्याचे लक्ष्य!
कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातून जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा गायब
पंतप्रधान मोदींच्या फोटोंमुळे पालटले लक्षद्वीपचे नशीब!
पंतप्रधान मोदींच्या रोड शोबाबत मुस्लिम समाजातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. एका ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींच्या रोड शोच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
पक्षाचे उमेदवार अतुल गर्ग यांच्या समर्थनार्थ शहरातील माळीवाडा चौकातून आंबेडकर रोडमार्गे चौधरी रोडपर्यंत रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.अतुल गर्ग यांचा सामना इंडी आघाडीतील नेत्या डॉली शर्मा आणि बसपचे नंदकिशोर पुंधीर यांच्यासोबत होणार आहे.२६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.