मोदी सरकारची तिसरी टर्म सुरू झाली असून या तिसऱ्या टर्ममध्ये तरुणांच्या हिताचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशातील तरुणांना रोजगार देण्यास मोदी सरकारने प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सर्व कॅबिनेट मंत्र्यांना स्वतंत्रपणे बोलावून रोजगार वाढविण्यासाठी धोरण बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका वर्षात ५० लाख नोकऱ्या निर्माण व्हाव्यात असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात रोजगार वाढविण्याला प्राधान्य दिले आहे. कॅबिनेट मंत्र्यांना स्वतंत्रपणे बोलावून पंतप्रधान मोदी देशात रोजगार वाढतील अशी धोरणं बनविण्याच्या सूचना देत आहेत. याशिवाय बुधवारी पंतप्रधानांनी वेगवेगळ्या विषयांवर कॅबिनेट समित्या स्थापन केल्या आहेत. या कॅबिनेट कमिटीमध्ये रोजगार आणि कौशल्य विकासचा समावेश असून, यामध्ये पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, हरदीप सिंग पुरी आणि कामगार-रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचाही समावेश आहे.
हे ही वाचा:
अंडरवर्ल्डशी संबंधित ३२८ कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयकडून पंतप्रधान मोदींना खास भेट
ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ
भारतीय विश्वविजेत्या शिलेदारांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संपूर्ण भर हा एका वर्षात ५० लाख नोकऱ्या वाढविण्यावर आहे. यातील सर्वांत जास्त संख्या संरक्षण, रेल्वे आणि पोस्ट आणि तार मंत्रालयाकडून आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाला रोजगार वाढवण्यासाठी संपूर्ण नेटवर्क तयार करण्यास सांगण्यात आले आहे. पीएमओतून सर्व सचिवांनाही सूचनासर्व कॅबिनेट मंत्र्यांना एकाप्रकारे रोजगार वाढवा, असे थेट सांगण्यात आले असून, खुद्द पंतप्रधान कार्यालयातून सर्व मंत्रालयांच्या सचिवांनाही यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत.