पंतप्रधान मोदींच्या कान्स चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा

पंतप्रधान मोदींच्या कान्स चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा

‘कान्स चित्रपट महोत्सव’ हा सर्वात मोठा चित्रपट महोत्सव मानला जातो. आजपासून या ‘कान्स चित्रपट महोत्सवा’ला सुरुवात झाली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून भारताच्या सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये, ७५ व्या कान्स चित्रपट महोत्सावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असल्याने खूप आनंद होत आहे. तसेच भारत आणि फ्रान्सच्या राजकीय संबंधांनादेखील ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, हे खूप अभिमानास्पद आहे.

‘कान्स चित्रपट महोत्सव’ हा सर्वात मोठा महोत्सव मानला जातो. यंदा १७ ते २८ मे दरम्यान ७५ वा कान्स चित्रपट महोत्सव होणार आहे. तसेच यंदाच्या महोत्सावाची खासियत म्हणजे या महोत्साव स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होणार आहे. यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सावात वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत.

याचा आनंद व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताकडे सांगण्यासाठी अनेक कथा आहेत आणि आपल्या देशात खऱ्या अर्थाने जगाचे सामग्री केंद्र बनण्याची अफाट क्षमता आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्माता असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

हे ही वाचा:

मोदी सरकारचा मोठा निर्णय; गव्हाच्या निर्यातीवरील बंदीमध्ये शिथिलता

मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद उभारल्याचा सलमान खुर्शीद यांचा दावा

‘या’ दिवशी अयोध्येतील राम मंदिर होणार भाविकांसाठी खुलं

गुंतवणूकदारांना एलआयसीने केले निराश

दरम्यान, कान्स चित्रपट महोत्सवात तीन भारतीय सिनेमांनी बाजी मारली आहे. पोटरा, कारखानीसांची वारी आणि तिचं शहर होणं या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाली आहे.

Exit mobile version