पंतप्रधान मोदी यांचा मुलाखतीतील दावा ठरला खरा

सॅम पित्रोदा पुन्हा काँग्रेसचे ओव्हरसीज अध्यक्ष

पंतप्रधान मोदी यांचा मुलाखतीतील दावा ठरला खरा

काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांच्या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी सॅम पित्रोदा यांना पुन्हा एकदा ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख केले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पित्रोदा आणि काँग्रेसबाबत अशीच भविष्यवाणी केली होती.

लोकसभा निवडणुकीदरम्यान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर अनेक आरोप केले होते. ‘कधी कधी मला वाटते, काँग्रेस पक्ष अशा लोकांच्या माध्यमातून काही गोष्टी हवेत सोडतात. हे नेते स्वतःच्या मर्जीने काही करत असतील, असे वाटत नाही. कारण जेव्हा गदारोळ माजतो, तेव्हा त्यांना पक्षातून काही दिवसांसाठी काढून टाकले जाते. त्यानंतर पुन्हा त्यांना मुख्य प्रवाहात घेतले जाते,’ असा दावा मोदी यांनी केला होता. ‘त्यांनी सॅम पित्रोदा यांचाही राजीनामा घेतला आहे. काही दिवसांनंतर पुन्हा ते त्यांना पद देतील, बघा. ही त्यांची जाणुनबुजून केलेली चाल आहे. भ्रम निर्माण करणे, वातावरण बदलणे, नवनवे मुद्दे जोडणे… अशा प्रकारच्या हुशाऱ्या ते करत राहतात,’ असे मोदी या मुलाखतीत म्हणाले होते.

वारसा हक्काबाबत वादग्रस्त विधान

लोकसभा निवडणुकीदरम्यान पित्रोदा यांनी वारसा हक्काबाबत विधान केले होते. यावरून मोठा राजकीय गदारोळ माजला होता. ‘अमेरिकेत वारसा कर लागतो. जर कोणाकडे १० कोटी डॉलरची संपत्ती असेल आणि त्यांचा मृत्यू होत असेल, तर ते त्यांच्या मुलाला यातील केवळ ४५ टक्केच देऊ शकतो. त्यातील ५५ टक्के मालमत्ता सरकार घेते,’ असे विधान त्यांनी केले होते.

हे ही वाचा:

राऊत म्हणतात, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा

केजरीवालांना सीबीआय कोठडीत भगवद्गीता बाळगण्याची परवानगी

चांद्रयान- ४ चंद्रावर पोहचण्यापूर्वीच रचणार इतिहास; यानाचे भाग दोन प्रक्षेपणांद्वारे कक्षेत पाठवणार

अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत दक्षिण आफ्रिकेने मिळवले फायनलचे तिकीट

भाजपने केली टीका

सॅम पित्रोदा यांची पुन्हा काँग्रेसच्या इंडियन ओव्हरसीज अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर भाजपने ‘एक्स’वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीतील ‘भविष्यवाणी’चा भाग शेअर केला आहे. ‘ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदी यांचा अंदाज होता, काँग्रेसकडून सॅम पित्रोदा यांचे निलंबन करणे केवळ निवडणुकीपुरतेच होते. आता त्यांना पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष केले गेले आहे. यामुळे काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांचा बनाव उघड झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.

Exit mobile version