पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला. तसेच सभेमध्ये राव यांच्यावर घराणेशाही व भ्रष्टाचाराचे सुद्धा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केले. विरोधी पक्षांचे नेते जनतेचा गैरवापर करतात. त्याच प्रमाने राज्याला अशा सरकाराची गरज आहे की जो स्वतःच्या घराणेशाहीला नव्हे तर जनतेला प्राधान्य देणारा असावा. असा टोलाही पंतप्रधान मोदी यांनी लगावला. तसेच तेलंगणा येथील रामागुंडम फर्टीलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी आले होते.
याचे वेळी भाषणामध्ये त्यांनी आपल्या ऊर्जेचे रहस्य सुद्धा तेलंगणातील नागरिकांसमोर उघडपणे सांगितले. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, मला बरेच लोक विचारतात तुम्ही एवढी मेहनत करून थकत का नाही. त्यावेळी मोदी सांगतात. मी खचून जात नाही. कारण मी रोज दोन-चार किलो शिव्या खातो. भगवंताने माझ्यात अशी दृष्टी निर्माण केली आहे, की या सर्व शिव्या माझ्या आत प्रक्रिया करून सुदृढ पोषणात बदलतात. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व ही ऊर्जा माझ्याकडून जनतेच्या सेवेसाठी वापरली जाते.
मोदी समर्थकांना पुढे म्हणाले की, निराशा आणि निराशेमुळे काही लोक अंधश्रद्धेपोटी सकाळी आणि संध्याकाळी पंतप्रधान मोदींना शिव्या देत असतात. पण त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. या शिव्यामुळेच मी आज एवढा तंदुरुस्त आहे. माझ्याकडे खूप ऊर्जा आहे. कारण हे सगळं शिव्या खल्यामुळे होत. मी मागील २० -२२ वर्षांपासून मी हे सगळं सहन करतोय. याची जनतेनी काळजी करू नका. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा
‘माझे तिकीट उद्धव ठाकरे यांनी कापले’
गोध्रा कटाच्या सूत्रधाराचा जामीन वाढविला
बेस्टमध्ये फुकट्या प्रवाशांचा सुळसुळाट
गजानन कीर्तिकरांचा उद्धव गटाला रामराम, शिंदे गटात सामील
तेलंगणा राज्याच्या सत्तेमध्ये पुढे आलेल्या पुढाऱ्यानीच राज्याला मागे ढकलले आहे. असे खेदजनक विधान सुद्धा पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. तर तेलंगणातील सरकार आणि नेत्यांनी नेहमीच राज्याच्या क्षमतेवर आणि तेथील लोकांच्या प्रतिभेवर अन्याय केला. ज्या राजकीय पक्षावर तेलंगणातील जनतेने सर्वाधिक विश्वास ठेवला, त्या पक्षाने तेलंगणाचा सर्वाधिक विश्वासघात केला.