पंतप्रधान मोदी यांनी अचानक रोड शो मार्ग वाढवला

पोलिसांनी लगेचच केले सुरक्षाकडे

पंतप्रधान मोदी यांनी अचानक रोड शो मार्ग वाढवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांसाठी स्वतःच्या सुरक्षेची काळजी न घेता अचानक रोड शोचा मार्ग सुमारे ५०० मीटरपर्यंत वाढवला. चौधरी रस्त्यावर रोड शो संपल्यानंतर त्यांनी प्रचार रथावरून उतरून ते गाडीमध्ये बसून निघू लागले तेव्हा जीटी रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोक उभे दिसले. अनेक तास प्रतीक्षा करत उभे असलेल्या लोकांसाठी पंतप्रधान बुलेटप्रूफ गाडीतून उतरून पुन्हा प्रचार रथात चढले आणि घंटाघर कोतवालीपर्यंत पोहोचले. अचानक पंतप्रधानांच्या रोड शोचा मार्ग वाढल्याने पोलिस अधिकारीही सतर्क झाले. त्यांनी दोरखंडांनी प्रचार रथाच्या दोन्ही बाजूंनी कडे केले.

मोदी यांना चौधरी रस्त्यावर रोड शो संपवून जीटी रोड, घंटाघरमार्गे एलिव्हेटेड रस्ता आणि तिथून दिल्लीला जायचे होते. चौधरी रस्त्यावर रोड शो संपल्यानंतर ते प्रचार रथातून उतरले आणि जनतेला अभिवादन करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह आणि स्थानिक खासदार व्ही के. सिंह यांची भेट घेतली. भाजपचे उमेदवार अतुल गर्ग यांनी पाया पडून मोदी यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर पंतप्रधान बुलेटप्रूफ गाडीत बसून जीटी रोड पोहोचले. रेल्वे रोडच्या आधी त्यांनी पाहिले की, मोठ्या संख्येने नागरिक रोड शोपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि जीटी रोडवर अनेक जण त्यांना पाहण्यासाठी उभे आहेत.

हे ही वाचा..

दक्षिणेतही भाजपला मिळणार ताकद; ममता यांना बसणार धक्का

लोकसभेपूर्वी कर्नाटक पोलिसांची धडक कारवाई; ७.६ कोटींची रोकड, सोने-चांदी जप्त

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगच्या आईला अटक

मोदीच्या गॅरंटीमुळे इंडी आघाडी चिंतेत!

भाजप महानगर अध्यक्ष संजीव शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी लगेचच त्यांची गाडी थांबवली आणि लोकांचे अभिवादन स्वीकारण्यासाठी पुन्हा प्रचार रथावर गेले. त्यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री, भाजपा प्रदेशाध्यक्ष, स्थानिक खासदार आणि उमेदवारही होते. या मार्गावरून पंतप्रधानांना केवळ स्वतःच्या गाडीत बसून जायचे होते. त्यामुळे येथे आंबेडकर रोड सारखी सुरक्षा व्यवस्था नव्हती. तरीही पंतप्रधानांनी सुरक्षेची काळजी न करता लोकांसाठी सुमारे ५०० मीटरपर्यंत उघड्या जीपमधून रोड शो केला आणि घंटाघर कोतवाली येथे उतरून बुलेटप्रूफ गाडीतून दिल्ली पोहोचले.

Exit mobile version