प्रसिद्ध संगीतकार इलैय्या राजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुस्तक लिहले आहे. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली आहे.‘आंबेडकर अँड मोदी: रिफॉर्मर्स आयडियाज, परफॉर्मर्स इम्प्लीमेंटेशन’ असे या पुस्तकाचे नाव आहे. त्याचे प्रकाशन १४ एप्रिल रोजी आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले. ब्लूक्राफ्ट डिजिटल फाऊंडेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
इलैया राजा यांनी पुस्तकात म्हटले आहे की, ” पंतप्रधान मोदी व डॉ. आंबेडकर हे दोघेही आक्रमक व्यक्तिमत्वाचे असून केवळ विचार करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करण्यावर त्यांचा भर आहे. डॉ. आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार असून दलितांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अनेक समानता आहेत. या दोघांनीही गरिबी आणि सामाजिक असंतुलन जवळून पाहिले. ते नष्ट करण्याचे काम केले. ”
भाजपाच्या तामिळनाडू युनिटने या पुस्तकाबद्दल इलैया राजा यांचे कौतुक केले आहे. तसेच, अनेक लोकांनीही इलैया राजा यांची प्रशंसा केली आहे. मात्र मोदींची आंबेडकरांशी तुलना केल्याबद्दल इलैय्या राजा हे अनेकांच्या टीकेचे लक्ष्य बनले आहेत. पण इलैयाराजा यांनी जे काही पुस्तकात लिहिले आहे ते योग्य असल्याचे, भाजपच्या तामिळनाडू युनिटने म्हटले आहे.
हे ही वाचा:
सुपरस्टार आर. माधवनच्या मुलाने असं काय करून दाखवलं?
ईडीकडून ‘ऍमवे’ कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त
काँग्रेस अडचणीत असताना राहुल गांधी सुट्टीवर परदेशात
थकबाकी असतानाही कोल इंडियाने केली राज्याच्या कोळसा पुरवठ्यात वाढ
इलैयाराजा स्वतः दलित समाजतील आहेत. आंबेडकर जयंतीनिमित्त गुरुवारी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ट्विटरवर पुस्तकाविषयी माहिती देताना प्रकाशकाने लिहिले की, भीमराव आंबेडकरांनी समाजातील प्रत्येक घटकाचा जसा विचार केला अगदी तसाच विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.