द्रौपदी मुर्मू या आता भारताच्या १५व्या आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. शिवाय, पहिल्या आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती म्हणूनही त्यांना सन्मान मिळाला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला आहे. दरम्यान, या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“मुर्मू यांनी मंत्री तसेच आमदार म्हणून चांगली कामगिरी केलेली आहे. झारखंडच्या राज्यपाल असताना त्यांनी आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली होती. राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतरही त्या देशविकासाच्या प्रवासात देशाचे नेतृत्व करतील, याचा मला विश्वास आहे,” असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Smt. Droupadi Murmu Ji has been an outstanding MLA and Minister. She had an excellent tenure as Jharkhand Governor. I am certain she will be an outstanding President who will lead from the front and strengthen India's development journey.
— Narendra Modi (@narendramodi) July 21, 2022
तसेच त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना मत देणाऱ्या सर्व खासदार आणि आमदारांचे आभार मानले आहेत. द्रौपदी मुर्मू यांची नरेंद्र मोदी यांनी भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं आहे.
Met Smt. Droupadi Murmu Ji and congratulated her. pic.twitter.com/ALdJ3kWSLj
— Narendra Modi (@narendramodi) July 21, 2022
हे ही वाचा:
आरे व्वा! शिंदे-फडणवीस सरकारने कारशेडवरील बंदी उठविली
व्हायरल व्हिडिओमध्ये नाना? चित्रा वाघ यांच्या ट्विटवर कारवाईचा इशारा
लोकसभेच्या गटनेतेपदावरून विनायक राऊतांची न्यायालयात धाव
भारताच्या दाेन महिला धावपटू उत्तेजक चाचणीत आढळल्या दाेषी; राष्ट्रकुल स्पर्धेला मुकणार
दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी ७७१ खासदार आणि ४ हजार २५ आमदारांसह ४ हजार ७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच द्रौपदी मुर्मू आघाडीवर होत्या. तिसऱ्या फेरीपर्यंत मुर्मू यांना वैध मतांपैकी ५० टक्के मते मिळाली आणि यशवंत सिन्हा यांना पराभूत करून मुर्मू यांना देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे. त्या येत्या २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील.