पंतप्रधान मोदी फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना

भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण

पंतप्रधान मोदी फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नरेंद्र मोदींना बॅस्टिल डे परेडच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. १४ जुलै रोजी या परेडला पंतप्रधान मोदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच भारत- फ्रान्स या दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे.

फ्रान्समध्ये १४ जुलै रोजी बॅस्टिल डे परेड होणार आहे. या दिवशी भारताच्या तीनही दलांतील मिळून २६९ सदस्य फ्रान्सच्या सैनिकांसोबत परेडमध्ये सहभागी होणार आहेत. १४ वर्षानंतर पहिल्यांच्या फ्रान्सच्या या नॅशनल डे परेडमध्ये भारताचे पंतप्रधान सामील होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यामध्ये महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी होणार आहे. संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाच्या राफेल- एम च्या कराराकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. फ्रान्स दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातीचाही (UAE) दौरा करणार आहेत.

भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारीला यावर्षी २५ पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्रापती इमॅनुएल मॅक्रोन यांनी पंतप्रधान मोदींना दौऱ्यासाठी खास आमंत्रित केलं आहे. या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी १४ जुलै रोजी पॅरिसमधील परेडमध्ये प्रमुख विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि इमॅनुएल मॅक्रोन यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडेल. त्यानंतर १५ जुलै रोजी ते संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यासाठी रवाना होतील.

हे ही वाचा:

रोहित शर्मा, यशस्वीमुळे भारताची सामन्यावर पकड

ठाणे गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, एक अटकेत

जम्मू- काश्मिरात पाच दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण

भारताने १९९८ साली पोखरणमध्ये अणुचाचणी केली तेव्हा अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी भारतावर अनेक निर्बंध लादले होते. तेव्हा भारताला पाठिंबा देणारा फ्रान्स हा पश्चिमेतील एकमेव देश होता. या घटनेनंतरचं दोन्ही देशांमधील मैत्रीला सुरुवात झाली होती. १९९८ मध्ये भारत आणि फ्रान्स एकमेकांचे सामरिक भागीदार बनले. याला २०२३ मध्ये २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Exit mobile version