पंतप्रधान मोदी पुन्हा ठरले जगभरातील सर्वांत लोकप्रिय नेते

सन २०१४ पासूनच अव्वलस्थानी

पंतप्रधान मोदी पुन्हा ठरले जगभरातील सर्वांत लोकप्रिय नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगभरातील सर्वांत लोकप्रिय नेते ठरले आहेत. अमेरिकी संस्था मॉर्निंग कन्सल्टच्या २०२४ च्या पहिल्या तिमाहीच्या निकालानुसार, भारतातील ७८ टक्के नागरिक पंतप्रधान मोदी यांच्या कामकाजाने समाधानी आहेत आणि त्यांनी नरेंद्र मोदी यांना त्यांचे नेते म्हणून स्वीकारले आहे. याआधी डिसेंबर २०२३च्या अहवालातही पंतप्रधान मोदी ७६ टक्के पसंती मिळवून जगभरात अव्वलस्थानी होते. यावेळी दोन टक्के अधिक नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामकाजाला पसंती देऊन त्यांना नेते म्हणून स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे.

या यादीत पंतप्रधान मोदी यांच्यानंतर ६५ टक्के मंजुरीसह मेक्सिकोचे राष्ट्रपती एंड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रडोर दुसऱ्या स्थानी आहेत. तर, ६३ टक्के मंजुरीसह अर्जेंटिनाचे राष्ट्रपती झेव्हिअर मिली हे तिसऱ्या स्थानी आहेत. चौथ्या स्थानी ५२ टक्के मंजुरीसह पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क आहेत. तर, पाचव्या स्थानी स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपती वियोला पॅट्रिशिया एम्हर्ड यांना ५१ टक्के नागरिकांची पसंती मिळाली आहे.

हे ही वाचा:

नाइटक्लबने प्रवेश न दिल्याने भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा गारठून मृत्यू

शरद पवार यांच्या गटाला ‘तुतारीवाला माणसा’चे चिन्ह

मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

कोलकत्ता उच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांना फटकारले

पंतप्रधान मोदी सन २०१४ पासून अव्वलस्थानी

जागतिकस्तरावर कामकाज आणि त्या त्या देशातील राजकीय नेत्यांच्या लोकप्रियतेच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी सन २०१४ पासून अव्वलस्थानी आहेत. सर्वांत आधी सन २०१४मध्ये प्यू रिसर्चने मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे कामकाज आणि नेत्यांच्या रूपात देशातील नागरिकांनी त्यांना कितपत स्वीकारले आहे, याबाबतचे सर्वेक्षण केले होते. त्यावेळी ७८ टक्के नागरिकांनी पतंप्रधान मोदी यांना समर्थन दिले होते. त्यानंतर मोदी वेगवेगळ्या सर्वेक्षणात अव्वलस्थानी कायम राहिले आहेत. करोनाकाळानंतर मे २०२२ मध्ये लोकल सर्कलमध्ये एका सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी यांना ६७ टक्के समर्थन मिळाले होते. जे त्यांचे आतापर्यंतचे सर्वांत कमी गुण आहेत. तर, एप्रिल २०२०मध्ये आयएनएस-सीवोटरच्या सर्वेक्षणात ९३ टक्के लोकांनी मोदी यांना समर्थन दिले होते. जे त्यांचे आतापर्यंतचे सर्वाधिक गुण आहेत.

Exit mobile version