पंतप्रधान मोदी ९ जूनला तिसऱ्यांदा शपथ घेण्याची शक्यता

राष्ट्रपती भवनात तयारीला वेग

पंतप्रधान मोदी ९ जूनला तिसऱ्यांदा शपथ घेण्याची शक्यता

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. शपथविधी सोहळ्याची तयारी राष्ट्रपती भवनात वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जूनला शपथ ग्रहण करू शकतात. पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी ५ ते ९ तारखेपर्यंत राष्ट्रपती भवन पर्यटकांसाठी बंद असेल.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक क्षण संबोधले आणि देशाच्या जनतेप्रति आभार मानले. ही आघाडी लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करेल, असा निर्धार केला.

हे ही वाचा:

भाजपला आत्मचिंतन करायला लावणारे निकाल!

‘चांगल्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा’

बीआरएसची पराभवाची मालिका सुरूच!

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशातील अंदाज चुकले

पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी ‘एक्स’वर निकालानंतर प्रतिक्रिया दिली. ‘देशातील जनता-जनार्दनाने एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे. भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे. या स्नेह आणि आशीर्वादासाठी मी माझ्या शुभचिंतकांना नमन करतो. मी देशवासींना विश्वास दाखवतो की, त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण नवी ऊर्जा, नव्या इच्छा, नव्या संकल्पांसह पुढे जाऊ. सर्व कार्यकर्त्यांनी ज्या समर्पण भावनेने अथक मेहनत केली, मी त्यांचे मनापासून आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो,’ अशा शब्दांत मोदी यांनी भावना व्यक्त केल्या.

Exit mobile version