पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील आयुष कुंडलची भेट घेतली आहे. हा आयुष्य कुंडल कोण आहे तर तो अपंग असूनही तो उत्तम चित्रकार आहे. त्याच्या या कौशल्याने तो लोकांची मने जिंकत आहे. पंतप्रधानही त्याचे चित्र काढण्याचे कौशल्य बघून भावूक झाले.
मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यातील बरवाह येथील आयुष हा रहिवासी आहे. तो जन्मतःच अपंग असून तो पायाने उत्कृष्ट चित्र काढतो. त्याचे चित्र पाहण्यासाठी अनेक ठिकाणांहून लोक येत असतात. मात्र आयुषने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याची इच्छा समजताच पंतप्रधान मोदींनी आयुषची आज भेट घेतली आहे.
आज @aayush_kundal से मिलना मेरे लिए एक अविस्मरणीय क्षण बन गया। आयुष ने जिस प्रकार पेंटिंग में महारत हासिल की और अपनी भावनाओं को पैर की उंगलियों से आकार दिया, वो हर किसी को प्रेरित करने वाला है। अनवरत प्रेरणा मिलती रहे, इसलिए मैं उन्हें ट्विटर पर फॉलो कर रहा हूं। pic.twitter.com/hHskGAFQXW
— Narendra Modi (@narendramodi) March 24, 2022
पंतप्रधान मोदींनी आयुषची भेट घेतल्यानंतर त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. आयुषची भेट घेतल्यानंतर पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहिले, “ आयुषची भेट माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला. आयुषने ज्याप्रकारे चित्रकलेत प्रभुत्व मिळवले आणि त्याच्या बोटांनी ज्या चित्राला आकार दिला, ते सर्वांना प्रेरणा देणारे आहे. प्रेरणा मिळत राहण्यासाठी मी त्याला ट्विटरवर फॉलो करत आहे. ”
हे ही वाचा:
माजी सरन्यायाधीश आर सी लाहोटी यांचे निधन
काश्मीर फाईल्सने जमवला २०० कोटींचा गल्ला! रचला ‘हा’ अनोखा विक्रम
विधानसभेत एकमताने ‘शक्ती कायदा’ मंजूर
‘परीक्षेचा हिजाब वादाशी संबंध नाही’, तातडीने सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
जन्मजात दोषांमुळे आयुष आपल्या पायावर उभा राहू शकत नाही. त्याच्या हातांचीही हालचाल होत नाही. त्यांना बोलताही येत नाही. अनेक शारीरिक कमतरता असतानाही तो पायाने उत्कृष्ट चित्रे काढतो. गेल्या वर्षी आयुषने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे चित्र काढले होते. आयुषने कुटुंबासह मुंबईला जाऊन अमिताभ यांना त्यांच्या बंगल्यावर हे चित्र सादर केले होते. त्यांची कला पाहून अमिताभ बच्चन भारावून गेले. अमिताभ यांनी आयुषचे पेंटिंग ट्विटरवर शेअर करून त्याच्या कलेचे कौतुक केले होते.