पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदेंची ‘रोजगार मोहीम’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या दृष्टीने आजचा दिवस आनंदाचा सोहळा असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदेंची ‘रोजगार मोहीम’

मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या मेळाव्याला हजेरी लावली होती.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार रोजगार देण्याचा देशात कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. हाच कार्यक्रम महाराष्ट्रातही राबवण्यात येत असून त्या अंतर्गत आज पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्र देण्यात आले. महाराष्ट्रात दोन लाख कोटी किंमतीचे २२५ प्रकल्पांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या दृष्टीने आजचा दिवस आनंदाचा सोहळा असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकार राज्यातील तरुणांना रोजगार देण्याचे काम करत आहे. सरकार विविध नोकऱ्यांसाठी मदत करत आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून सरकार मदत करत आहे. या योजनेचा महाराष्ट्राने फायदा घेतला. ग्रामीण भागातही बचत गट सुरु केले असून, त्यातून महिलांना मोठया प्रमाणावर रोजगार मिळत आहेत, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे.
रोजगाराच्या विविध संधी केंद्र शासनातर्फे उपलब्ध करून दिल्या जातं आहेत. महाराष्ट्रात दोन लाख कोटी किंमतीचे २२५ प्रकल्प महाराष्ट्राला देण्यात आले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या सरकार निर्माण करत आहे. गेल्या आठ वर्षात आठ कोटी महिला बचत गटाद्वारे जोडल्या गेल्या. इतर महिलांना रोजगार देण्याचे काम बचत गट करत असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.

आजचा दिवस राज्याच्या दृष्टीने आनंदाचा सोहळा आहे असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातून सातत्याने मेसेज यायचे की भरती कधी आहे. त्यामुळे आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे. देशात ७५ वर्षे आणि ७५ हजार नोकऱ्या देऊ अशी घोषणा सरकारने केली आहे. वर्षभरात या नोकऱ्या द्यायच्या असून, आजचा हा पहिला टप्पा आहे. राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार आहे. राज्याच्या विकासाला गती देण्याचे काम हे सरकार करत आहे. महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य आहे ज्याने रोजगार द्यायला सुरवात केली आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यातील पोलीस खात्यातही १८ ते २० हजार नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. प्रत्येक विभागातील रिक्त पदं भरण्यात येत आहेत. एमपीएसचीच्या बळकटीकरणासाठीही आम्ही प्रयत्न करत असल्याचे शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

नितेश राणेंचा मोर्चा आणि त्याच रात्री लागला मुलीचा शोध

संभाजी भिडेंनी पत्रकाराला सांगितले, आधी टिकली लाव मगचं बोलू

मुंबईत एका मुलीचे फुटपाथवरून अपहरण, दोन महिला अटकेत

राज्यातील बँकिंग घोटाळ्यांची होणार चौकशी

सरकारबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, मागची अडीच वर्षे काहीच नव्हतं. आपलं सरकार आलं आणि उत्साह, चैतन्य आलं. आमच्या सरकारमध्ये पारदर्शकता आहे. हे गतिमान सरकार आहे. वातावरण आणि लोकांचा दृष्टिकोन बदलायला हवा, अशी चर्चा आम्ही अधिकाऱ्यांशी केली. नोकरभरतीसाठी काम केलेल्या अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत.

Exit mobile version