मनसुख हिरेन ह्यांची आत्महत्या की हत्या हा प्रमुख प्रश्न आहे, पण सकृत दर्शनी ती हत्याच आहे असे विधान भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“काल ज्या घटनेने महाराष्ट्रच नाही तर देश हादरला त्या मनसुख हिरेन यांची आत्महत्या की हत्या हा प्रश्न आहे. सकृत दर्शनी ती हत्याच आहे पण हा निष्कर्ष पोलिसांनी काढायचा आहे. या विषयात देवेंद्रजींनी विधानसभेत घटनाक्रम मांडला. पोलीस अधिकारी वाझे आणि मनसुख यांच्यातील संभाषणाचे सगळे डिटेल्स दिले. तरीही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लाईट आणि गांभीर्य नसणारे निवेदन दिले.” असा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी, महाराष्ट्राच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण करणारी मनसुख हिरेन यांची हत्या की आत्महत्या? हा मूळ मुद्दा आहे. या विषयामध्ये @Dev_Fadnavis यांनी सगळा घटनाक्रम मांडूनही गृहमंत्र्यांनी जे निवेदन केलं ते अतिशय बेजबाबदारपणाचं आहे. – @ChDadaPatil pic.twitter.com/Sfby3r4ash
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 6, 2021
हे ही वाचा:
“मनसुख हिरेन याचा मृतदेह ही मोठी घटना आहे. म्हणूनच मुंबईचे आयुक्त धावत विधान भवनात आले. छोटी घटना असती तर कशाला आले असते?” असा सवालही पाटील यांनी विचारला आहे. “जगातल्या पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीत ज्यांचा क्रमांक लागतो ते सुद्धा असुरक्षित असतील तर हे खूप गंभीर आहे.” असेही पाटील म्हणाले