पूर्वीची सरकारे केवळ आपल्या कुटुंबाच्या तिजोऱ्या भरत होती

पूर्वीची सरकारे केवळ आपल्या कुटुंबाच्या तिजोऱ्या भरत होती

उत्तर प्रदेशातून मोदींची विरोधकांवर टीका

“पूर्वीची सरकारे केवळ आपल्या कुटुंबाच्या तिजोऱ्या भरत होती आणि स्वतःसाठी कमाई करत होती. पण आमचे प्राधान्य गरिबांचे पैसे वाचवणे आणि त्यांना सुविधा देणे हे आहे.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी उत्तर प्रदेशातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करताना म्हणाले. २ हजार ३२९ कोटी रुपये खर्च करून बांधलेली ही वैद्यकीय महाविद्यालये सिद्धार्थनगर, एटा, हरदोई, प्रतापगढ, फतेहपूर, देवरिया, गाझीपूर, मिर्झापूर आणि जौनपूर जिल्ह्यात आहेत.

सिद्धार्थनगर येथील उद्घाटन समारंभावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया उपस्थित होते.

महाविद्यालयांचे उद्घाटन केल्यानंतर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “नऊ वैद्यकीय महाविद्यालये निरोगी भारताची स्वप्ने पूर्ण करतील. ही महाविद्यालये राज्यातील जनतेला मिळालेली एक भेट आहेत.”

मोदी म्हणाले की, या नऊ महाविद्यालयांमुळे ५ हजारपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि सुमारे २ हजार ५०० हॉस्पिटल बेड जोडले जातील. “पूर्वीच्या सरकारांनी ‘पूर्वांचल’च्या लोकांना आजारांनी ग्रासलेल्या स्थितीतच ठेवले होते. पण आता ते उत्तर भारताचे वैद्यकीय केंद्र बनले आहे.” असं मोदी म्हणाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधे देशभरात अनेक रुग्ण आणि मृत्यू होत असताना उत्तर प्रदेशवर आणि राज्यातील योगी सरकारवर विशेष टीका केली जात होती. परंतु आता याच उत्तर प्रदेशात मोदींच्या हस्ते ९ वैद्यकीय महाविद्यालयांचे उदघाटन केले जात आहे.

हे ही वाचा:

नवाब मलिक माझ्या मृत आईवर हल्ले करत आहेत

मला चुकीच्या पद्धतीने अडकवले जात आहे, वानखेडे यांनी लिहिले पत्र

… म्हणून त्याने मारली राज्यपालांच्या कानशिलात!

नाशिकमधील शिवसैनिकांना पडला उद्धव ठाकरेंचा विसर!

“केंद्राने भारतात १५७ वैद्यकीय महाविद्यालये उघडली आहेत.” अशी माहिती मांडविया यांनी दिली. मोदी यांनी दुपारी १.१५ वाजता वाराणसीमध्ये प्रधानमंत्री आत्मनिरभर आरोग्य भारत योजनेचा शुभारंभही केला. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत मोदींचा हा दुसरा उत्तर प्रदेश दौरा आहे.”

Exit mobile version