जो खरा असेल तो ईडीच्या तपासाला सामोरे जाईल, केजरीवालांना गंभीरने लगावला टोला!

पक्षात येण्यासाठी भाजकडून दबाव, अरविंद केजरीवाल

जो खरा असेल तो ईडीच्या तपासाला सामोरे जाईल, केजरीवालांना गंभीरने लगावला टोला!

ईडीच्या कारवाईमुळे विरोधी पक्षातील नेत्यांना धडकी भरली आहे.ईडीच्या कारवाईमुळे नुकतेच झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.अनेक बडे नेते ईडीच्या जाळ्यात गुरफटत चालले आहेत.त्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही समावेश आहे.परंतु, भाजपमध्ये येण्यासाठी माझावर दबाव टाकला जातोय असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.भाजपमध्ये गेल्यावर सर्व खून माफ होतात असे वक्तव्य केजरीवाल यांनी केले.मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या आरोपावर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने प्रत्युत्तर दिले.जो खरा असेल तो तपासाला सामोरे जाईल, असे गौतम गंभीर म्हणाले.

ईडीने अबकारी धोरणातील घोटाळ्याच्या संदर्भात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना पाच वेळा समन्स पाठवण्यात आले.परंतु, ईडीकडून पाठवण्यात आलेले सर्व समन्स केजरीवाल यांनी धुडकावून लावत भाजपवर आरोप केले.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, पक्षात येणासाठी भाजप माझ्यावर दबाव टाकत आहे.भाजप माझ्याबाबतीत षडयंत्र रचत आहे.परंतु कितीही षडयंत्र रचले तरी ते सफल होणार नसल्याचे केजरीवाल म्हणाले. भाजपला मी नकार दिल्यामुळे हे सर्व होत आहे.भाजपमध्ये गेले तर सर्व गुन्हे माफ होतात. आम्ही काय चूक केली.आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही त्यामुळे आम्ही कोणासमोर झुकणार नाही, असे केजरीवाल म्हणाले.यावर पूर्व दिल्ली मतदारसंघाचे खासदार आणि केजरीवाल यांचे विरोधक, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा:

‘नव’ नामक वाघाच्या मृत्यूने लुधियाना टायगर सफारी पर्यटकांसाठी झाली बंद!

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेच्या लाभापोटी २००हुन अधिक जोडप्यांनी केला ‘बनावट’ विवाह!

इतके दिवस ‘वरिष्ठां’चे ऐकलेत, आता माझे ऐका!

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी कायमस्वरुपी निधी देणार

गौतम गंभीर म्हणाले की, सक्तवसुली संचालनालय,आयकर विभाग अशा ज्या शासकीय तपास यंत्रणा आहेत, ते आपले काम करत आहेत आणि त्यांना आपले काम करू द्या.मला असे वाटते की, जे खरे असतात ते निधड्या छातीने सामोरे जातात, ते पळून जात नाहीत, यालाच तर इमानदारी म्हटले जाते.याच्याव्यतिरिक्त माझ्याजवळ बोलण्यासारखे काहीच नाही, असे गौतम गंभीर म्हणाले.

Exit mobile version