28 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरराजकारण'धनुष्यबाण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही'

‘धनुष्यबाण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही’

Google News Follow

Related

शिवसेनेचं चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे याबाबत शिवसैनिकांनी मनात कोणताही संभ्रम ठेऊ नये, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हवर दावा केला. यावरून उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना नवे आवाहन केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

कालपासून मी अनेक शिवसैनिकांशी संवाद साधत आहे. सगळ्यांच्या भावना दाटून आल्या आहेत. लोकांवरील दडपण हलकं करणं माझं काम आहे. शिवसैनिकांवर दडपण वाढेल असं मी बोलणार नाही. पण कालच्या भेटीगाठीतील चर्चेतून शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरु आहे. कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेत नाही. लोक धनुष्यबाणचं नव्हे तर उमेदवारही पाहतात. काल मी शिवसैनिकांना गेल्या काळात काय काय झालं होतं ते काल सांगत होतो. त्यामुळं त्याचा अर्थ असा होत नाही की आमचं चिन्ह जाणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाभवनात साधेसाधे शिवसैनिक येत होते. कालपरवापर्यंत शिवसेनाभवनात राज्यातील शिवसैनिक महिला आल्या होत्या आणि त्या वाघिणीप्रमाणे बोलत होत्या. शिवसेनेनं साध्या व्यक्तींना मोठं केलं. पण जी मोठी झाली ती गेली. पण मोठ्या मनाची ही साधी माणसं जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला धोका पोहोचू शकत नाही.

हे ही वाचा:

‘मविआ सोडा, मोदींशी चर्चा करा’

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘चिन्ह’ जाणार?

कल्याण डोंबिवली, पुण्यातही शिवसेनेला खिंडार

संजय पांडेंवर तीन गुन्हे दाखल, सीबीआयची छापेमारी

मला, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंना एवढं प्रेम देत आहेत त्यासाठी उद्धव ठाकरेंनी बंड केलेल्या आमदारांचे आभार मानले आहेत. पण पक्षात असताना जेव्हा भाजपा शिवसेनेवर टीका करत होती तेव्हा का नाही बोलले? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आहेत. यावर आमदार सुहास कांदे यांनी प्रत्युत्तर केले आहे. ते म्हणाले, ज्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलाय. सत्ता स्थापन केली होती, अशी टीका कांदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा