उद्धव ठाकरे राज्यपालांवर घसरले!

उद्धव ठाकरे राज्यपालांवर घसरले!

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल विधान केले. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी राज्यपालांविरोधात त्यांनी अवहेलना करणारे विधान केले. ज्यांना वृद्धाश्रमात जागा नाही अश्यांना राज्यपाल म्हणून नेमलं जात का? हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्यपालांवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, ज्याचं सरकार केंद्रात असते, त्यांच्याच विचारांची माणसं सगळ्या राज्यांत राज्यपाल म्हणून पाठवली जातात. या माणसांची कुवत, पात्रता काय असते? ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? हा प्रश्न केंद्राला विचारायला हवा. राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवायला हवेत, असे माझं मत आहे. राज्यपाल राष्ट्रपतींचे दूत असतात. राष्ट्रपती नि:पक्ष असायला हवेत, तसेच राज्यपालही असायला हवेत. राज्यपाल जे काही बोलतात, ते गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यपालांना राज्यपाल म्हणणं मी सोडून दिले आहे. राज्यपाल पदाचा मी मान करतो, यापुढेही करेन. पण राज्यपालपदाची झूल कुणी पांघरली, म्हणजे त्यांनी वेडंवाकडं काहीही बोलावं हे मी आणि महाराष्ट्र मान्य करेल असं मला वाटत नाही. यापूर्वी कोश्यारींनी ठाण्यातील मराठी लोकांचा अपमान केला होता. त्यानंतर हे थांबले नाहीत आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केले. या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे, असाही आक्षेपार्ह विधान उद्धव यांनी केले आहे. तसेच राज्यपालांना हटवलं गेलं नाही तर महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्र द्रोह्यांचा विरोध करणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : 

दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नव्हतेच, मग तो मृत्यू अपघाती असल्याचा दावा कुणाचा?

शौचालयाच्या स्वच्छतेसाठी वापरावे लागते खारे पाणी

‘स्निफर’ डॉग ठेवणार आता परदेशी टपालावर नजर

लोकांची सेवा करतोय तोपर्यंत सरकार टिकेल

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील काही भागावर दावा केला. याबद्दलसुद्धा उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय. जणूकाही महाराष्ट्रात माणसं राहातच नाहीत.

Exit mobile version