‘असं मी म्हणालोच नव्हतं’, शरद पवार खरे की पत्रकार?

‘असं मी म्हणालोच नव्हतं’, शरद पवार खरे की पत्रकार?

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेना भाजपा सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी बैठक झाली होती. या बैठकीत शिंदे फडणवीस सरकार लवकरच कोसळेल आणि पुढच्या सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र आज, १० जुलै रोजी औरंबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत शरद पवारांना विचारणा झाली. मी असं कधी म्हणालोच नव्हत, फक्त निवडणुकीच्या कामाला लागा असं मी म्हणालो होतो, असं उत्तर शरद पवारांनी दिल आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांच्या बातम्या देणारे पत्रकार खरे की शरद पवार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या परिषदेत पवारांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्दावर पवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात नामांतराचा मुद्दा नव्हता. तसेच नामांतराच्या मुद्दावर सुसंवाद झाला नव्हता असंही अस पवार यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम मानला जातो. म्हणून उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचा नामांतरणाचा निर्णय घेतला आणि जाहीर केला, असा धक्कादायक खुलासा शरद पवार यांनी केला आहे. या विधानामुळे शरद पवार यांनी नामांतराच्या मुद्दातून राष्ट्रवादी काँग्रेसला बाजुला केलं का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्री असलो तरी, जनतेचा सेवक’

जोहान्सबर्गमध्ये झालेल्या गोळीबारात १४ जणांचा मृत्यू

गौतम अदानींची होणार टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री?

एलन मस्क म्हणजे तिकीट नसलेले प्रवासी; ट्विटर करार रद्द केल्यानंतर महिद्रांनी लगावला टोला  

आगामी काळात येणाऱ्या निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात असा माझा व्यक्तिगत विचार असल्याचे पवार म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना नेमकी कोणाची याचा निर्णय उद्या न्यायालयात लागेल, असं म्हणत आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे.

Exit mobile version